Homeकोपरगावआत्मा मालिकच्या शिवाजी ढोले यांची महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मध्ये निवड

आत्मा मालिकच्या शिवाजी ढोले यांची महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मध्ये निवड

कमवा व शिका योजनेची किमया

कोपरगाव :- कोपरगाव येथील आत्मा मलिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी शिवाजी रावसाहेब ढोले यांनी कमवा शिका योजनेच्या माध्यमातून आपले करिअर घडवीले. त्यांना मोफत प्रशिक्षण घेता आले. त्यांची नुकतीच महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मध्ये निवड झाली. हे प्रशिक्षण केंद्र आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरले आहे.

वर्षभराच्या कालावधित शेकडो विद्यार्थ्यांना विविध शासकीय सेवांमध्ये संधी मिळवून मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहे. अकरावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण देणारे महाराष्ट्रातील एकमेव सर्वसमावेशक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आहे. गरीब, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना “कमवा व शिका” योजनेअंतर्गत अगदी मोफत प्रशिक्षण देऊन शंभर टक्के निकाल देण्याची परंपरा या केंद्राने निर्माण केली. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे सैन्य, पोलीस व विविध शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न या माध्यमातून प्रत्यक्षात उतरते आहे. प्रशिक्षक साईनाथ वर्पे, चेतन गिरमे, प्रवीण पठारे, सुधीर नाकाडे, हेमाकांत पाटील हे माजी सैनिक आहेत. त्यांच्या बरोबरच गंगाधर खाटेकर, करण मापारी तसेच वसतीगृह अधीक्षक अजय खरात, मनोज जगताप, कार्तिक दिवेकर यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष मेहनत घेतली.

संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी , शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसती गृह व्यवस्थापिका मीरा पटेल यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!