Homeकोपरगावदेर्डे कोऱ्हाळे येथे बस थांबा माजी आमदार कोल्हेंचे अभिनंदन

देर्डे कोऱ्हाळे येथे बस थांबा माजी आमदार कोल्हेंचे अभिनंदन

कोपरगांव :- तालुक्यातील पश्चिम भागात जास्त दळणवळण असलेल्या देर्डे कोऱ्हाळे येथे कोपरगांवसह अन्य आगाराच्या बसेसला अधिकृत थांबा मिळवुन दिल्याबददल माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे व राज्य परिवहन विभाग अहिल्यानगर प्रशासकीय यंत्रणेचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरूणराव येवले यांनी अभिनंदन केले आहे.

त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, एन एच १६० शिर्डी नाशिक महामार्गावर देर्डे कोऱ्हाळे गांव असुन येथुन आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या साईबाबांची शिर्डी, अहिल्यानगर, कोपरगांव तसेच नाशिक मुंबई येथे दररोज ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे मात्र येथे या मार्गावरून धावणाऱ्या बस थांबत नसत परिणामी प्रवाशांची मोठ्या प्रमाणांत गैरसोय होत होती त्याबाबत स्थानिक रहिवासी, देर्डे – कोऱ्हाळे ग्रामपंचायत, प्रवाशांनी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व कोपरगांव, अहिल्यानगर, नाशिक आगार प्रमुखांकडे तक्रार करून देर्डे कोऱ्हाळे येथे सर्व बसेसला थांबा द्यावा म्हणून मागणी केली होती त्यास कोपरगांव आगार व अहिल्यानगर विभागीय अधिकारी यांच्याकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळुन देर्डे कोऱ्हाळे येथे सर्व बस आता अधिकृतरित्या थांबत असल्यांने प्रवाशांसह नागरिकांनी राज्य परिवहन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे सरपंच नंदा निवृत्ती दळवी, उपसरपंच निलेश मधुकर डुबे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गांवचे स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थांनी आभार मानून आनंद व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!