HomeUncategorizedश्री आदिशक्ती रेणुका देवी व श्री बालेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा

श्री आदिशक्ती रेणुका देवी व श्री बालेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा

संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव शहरालगत गोदावरी नदीतीरावर वसलेल्या जेऊर पाटोदा शिवारात चंद्रलिलानगर मध्ये पुरातन पूर्वीपासूनच्या नुतन जिर्णोद्धारीत मंदिराचा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवार दि.१७मे२०२२ पासून ते शुक्रवार दि.२०मे २०२२ पर्यंत होमहवन प्राणप्रतिष्ठा सोहळा व कलश/ मूर्ती मिरवणूक काढण्यात

येणार आहे. तसेच
शुक्रवार दि.२०मे२०२२ रोजी सकाळी १२: ०७ वा.राष्ट्रसंत जनार्दन स्वीमी महाराज आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते पूजा संपन्न होऊन दु.१वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे याचवेळी कलशारोहण व आशिर्वाद संपन्न होणार आहे.
या जिर्णोध्दार सोहळ्यासाठी पंचक्रोशितील भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन या सोहळ्याचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन साई चंद्रलिला नगर,धारणगाव रोड, जेऊर पाटोदा,कोपरगाव येथे चंद्रलिलानगर परीवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
ज्या महिला भगिनींना कलश मिरवणुकीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी बुधवारी सकाळी सात वाजता मंदिराजवळ उपस्थित रहावे त्याचप्रमाणे ज्यांना जोडीने प्राणप्रतिष्ठेस बसावयाचे आहे त्यांनी९०११८१९००१/९४२२९४६०००येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!