
संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे बौद्घ जयंती दि.१६ मे रोजी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने खळे परिवाराच्या वतीने तथागत भगवान गौतम बुध्द व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून केली साजरी.
त्याच बरोबर विजय त्रिभुवन व राजू उशिरे यांनी ही प्रतिमा पूजन केले व तद्नंतर विजय त्रिभुवन यांनी पंचशील पठन केले.
यावेळी कुंभारी येथील माजी. मुख्याध्यापक ठाणगे सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि,अडीचं हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धाने दुःखाचे मूळ कारण तृष्णा असून तृष्णेच्या मागे न लागता सत्य शोधून त्यावर विश्वास ठेवणे आवश्यक तसेच शांती हा सुखाचा मार्ग आहे असे तत्वज्ञान सांगितले होते,बुद्धांचे सत्य व शांती ही शिकवण जगाला तारु शकते, त्याचबरोबर जेष्ठ शिक्षक वारुळे सर,निळकंठ सर यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी खळे परिवाराच्या वतीने समस्त कुंभारी ग्रामस्थांना (खीरदान) प्रसादाचे वाटप करण्यात आले होते.
त्याचबरोबर सदर कार्यक्रमाचे औचित्य साधतं नवनिर्वाचित कुंभारी नं २ सोसायटीचे चेअरमन सोपानराव चिने यांचा भगवान खळे यांच्या हस्ते तर व्हाईस चेअरमन दिलीपराव ठाणगे यांचा विकास खळे यांच्या हस्ते,तसेच कुंभारी नं.१ सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेवराव कदम यांचा राहुल खळे यांच्या हस्ते तर व्हाईस चेअरमन सतिषराव कदम यांचा सचिन खळे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कुंभारी पंचक्रोशीतील मुले -मुली,महिला व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.