
कोपरगाव :- तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी जगदंबा देवीचे नवरात्र उत्सवानिमीत्त २० ऑक्टोंबर पर्यंत ह भ प बाबुराव महाराज चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत दुर्गा सप्तशती ग्रंथाचे सामुदायिक पारायण तर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत विविध किर्तन जागरचे आयोजन करण्यांत आले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जगदंबा माता मंदिर भक्त मंडळाने केले आहे.

श्रीक्षेत्र चासनळी येथे जगदंबा देवी मंदिरात नवरात्र घटस्थापना होवुन स्वानंद भजनी मंडळ नाशिक यांचा भारूडाचा व जोगवा कार्यकम (१३ ऑक्टोंबर), ह.भ.प. कुमारी ज्ञानेश्वरी सोनवणे (१४ ऑक्टोंबर), ह.भ. प. कृष्णा महाराज कमानकर (१५ ऑक्टोंबर), ह.भ.प. कावेरी महाराज घुमरे (१६ ऑक्टोंबर), ह. भ. प. भरत महाराज चांदगुडे (१७ ऑक्टोंबर), ह. भ. प. गिता महाराज घोरवडकर (१८ ऑक्टोंबर ), ह. भ. प. बाळासाहेब महाराज रंजाळे (१९ ऑक्टोंबर), यांचा नवरात्र उत्सव काळात रात्रौ ७ ते ९ या वेळेत किर्तनांचा जागर होत आहे. १९ ऑक्टोंबर रोजी होम हवन होईल. तर ह. भ. प. बाबुराव महाराज चांदगुडे यांचे विजयादशमीच्या दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत किर्तन होवुन सामुदायिक महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. महिला मंडळ, ज्ञानेश्वर भजनी मंडळ, जगदंबा कला कीडा सांस्कृतिक मित्र मंडळ, स्वामी समर्थ सेवा मंडळ, श्रीराम तरूण मित्र मंडळ, हिदुराज तरूण मित्र मंडळ, आण्णाभाऊ साठे तरूण मित्र मंडळ, माणकेश्वर तरूण मित्र मंडळ, जगदंबा माता व्यवस्थापक समिती, जगदंबा माता यात्रा कमिटी, नरसिंह मित्र मंडळ, महाकाल मित्र मंडळ यासह सर्व युवक युवती मंडळ, चासनळी पंचकोशीतील भाविक भक्त कार्यकम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. या नवरात्र उत्सव काळात पहाटे काकडा, सायंकाळी हरिपाठ व रात्री प्रहारा हरीजागर कार्यकम नित्यनियमाने होतील. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यांत आले आहे. ह. भ. प. सुवर्णाताई जमधडे व ह. भ. प. आकाश महाराज आव्हाड यांची किर्तने पार पडली.