
सहापैकी तीन गटांत अजिंक्यपद पटकावत रचला इतिहास
कोपरगाव : – महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत सोमैया विद्याविहार, मुंबई संचलित सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडीच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत विद्यालयाच्या खेळाडूंनी सहापैकी तब्बल तीन गटांत अजिंक्यपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली.14 वर्षाखालील मुली,19 वर्षाखालील मुली व 19 वर्षाखालील मुले या तीन संघांनी अजिंक्यपद पटकाविले आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही विजयी संघांची पुणे विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
या यशामागे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री. संजय अमोलिक तसेच बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीमती रूपाली टेके व श्रीमती शुभांगी राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय समीर सोमैया सर, क्रीडा अकादमीचे प्रमुख एझाझ खान सर, आदित्य सिंगसर, स्थानिक शाळा समितीचे सचिव मा. सुहास गोडगे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय राऊत, क्रीडा समन्वयक श्री. रोहन शिंदे सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाच्या खेळाडूंनी मिळवलेल्या या यशामुळे सोमैया विद्यामंदिर,लक्ष्मीवाडीच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.