Homeराहुरीराहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने गरजूंना वस्तूंचे वाटप !!

राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने गरजूंना वस्तूंचे वाटप !!

संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव,
राहुरी तालुका प्रहारचे सचिव योगेश लबडे याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ब्राम्हणी शाखाध्यक्ष बाबूराव शिंदे सर याच्या अध्यक्षतेखाली पिंप्री अवघड शाखाध्यक्ष रामभाऊ पटारे याच्या सहकार्याने पाच दिव्यांग बांधवाना तीन चाकी सायकल व चार दिव्यांगाना कुबड्या देण्यात आल्या,वारकरी संप्रदाय तालुकाध्यक्ष माजी सरपंच बाळनाना बानकर याच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी ज्या दिव्यांगाना सायकली मिळाल्या त्यांचा चेहरा आनंदाने खुलून दिसत होता. अपंगत्वामुळे एका ठिकाणी बसलेले दिव्यांग आता सायकल व कुबडयामुळे स्वावलंबी होणार आहे त्यांना एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी जाणे सहज शक्य होणार असल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना मा.नामदार बच्चू भाऊ कडू याच्या मार्गदर्शना खाली वर्षभर अनेक उपक्रम राबवित असतात.दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी लढणारी प्रहार एक सामाजिक संघटना आहे.
यावेळी राहुरी तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यामध्ये ब्राम्हणी शाखेने राबविलेला उपक्रम खरच च खुपच चांगला व आदर्शवत आणि इतरांना दिशा देणारा आहे.
राहुरी तालुका प्रहारच्या वतीने चालू असलेल्या “चला घर बांधाय दिव्यांगाचे “या उपक्रमा अंतर्गत राहुरी येथील मुलामाथा भागात सौ.सुनीता लोखंडे या दिव्यांग महिलेचे घर बांधायचे काम प्रगती पथावर चालू आहे त्या कामासाठी वस्तू स्वरुपात किंवा आर्थिक स्वरुपात मदत करावी असे आवाहनही या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
यावेळी विठ्ठल पांडे,तालुका सल्लागार सलीम भाई शेख, संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी, ब्राम्हणी शाखाध्यक्ष बाबूराव शिंदे सर,राहुरी शहराध्यक्ष वैभव थोरात,टाकळी मिया शाखाध्यक्ष ह भ प नानासाहेब शिंदे महाराज, उपाध्यक्ष सुरेशदादा दानवे,राहुरी खुर्द शाखाध्यक्ष दत्तात्रय खेमनर, उपाध्यक्ष ह भ प आदिनाथ दवणे महाराज,रामभाऊ साठे.तुकाराम शिंगाडे,इमरान आतार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे शेवटी आभार जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!