

देर्डे चांदवड ग्रामपंचायतीसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्यांच्या पाणी पुरवठयाची योजना मंजूर झालेली असताना त्याचे परस्पर श्रेय आमदार आशुतोष काळे लाटत आहे तेव्हा सदर योजनेचे भूमिपुजन तात्काळ रदद करावे या मागणीचे निवेदन सरपंच कैलास गायकवाड व उपसरपंच योगेश कोल्हे यांनी तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना दिले.
संपादक – राजेंद्र तासकर
तालुक्यातील देर्डे चांदवड ग्रामपंचायतीसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्यांच्या पाणी पुरवठयाची योजना मंजुर झालेली असुन त्यासाठी केंद्र शासनाचा ६० टक्के निधी मंजुर झालेला असुनही त्याची उदघाटने मात्र सध्याचे आमदार आशुतोष काळे करत आहेत या कृत्याचा देर्डे चांदवड रहिवासीयांच्यावर्तीने जाहिर निषेध करून सदरची भूमिपुजने तात्काळ रदद करावी अशी मागणी सरपंच कैलास गायकवाड व उपसरपंच योगेश कोल्हे यांनी तहसिलदार व गटविकास अधिकारी कोपरगांव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व ग्रामपंचायतीसाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्यांच्या पाणी पुरवठयाची योजना मंजुर केली त्यासाठी केंद्र शासनाचा ६० टक्के निधीही वितरीत केला मात्र आमदार आशुतोष काळे हेच या योजनेचे परस्पर श्रेय लाटत असून त्यांनी समाजमाध्यमावर प्रसिध्द केलेल्या कार्यक्रमांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्याचेही औदार्य दाखविले नाही,सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना भूमिपुजनाचा कार्यक्रम ठरवितांना विश्वासात घेतले नाही, त्याबाबत प्रथम नागरिक या नात्याने सरपंच उपसरपंच यांना मान दिला नाही,या योजनेसाठी तत्कालीन आमदार व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा केला व मंत्रालय स्तरावर तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बैठका घेतल्या,देर्डे चांदवड रहिवासीयांच्या पिण्यांच्या पाण्यांची समस्या लक्षात आणून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत त्यास मंजुरी दिली असे असतानाही आमदार आशुतोष काळे हे स्वतःच श्रेय लाटुन त्याचे भूमिपुजन करत आहे तेव्हा हा भूमिपुजनाचा कार्यक्रम तात्काळ रदद करावा असेही ते शेवटी म्हणाले.याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे,महेश माळी, ऋषीकेश पगारे,अंकुश पवार, वैभव होन,किशोर होन,शशीकांत अरगडे उपस्थित होते. नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी व पंचायत समितीचे कक्ष अधिकार राजेश डोंगरे यांनी निवेदनाचा स्विकार केला.