Homeकोपरगावआमदार काळेंनी नाटेगाव पाणी योजनेचे श्रेय लाटू नये _सरपंच विकास मोरे

आमदार काळेंनी नाटेगाव पाणी योजनेचे श्रेय लाटू नये _सरपंच विकास मोरे

संपादक – राजेंद्र तासकर

         तालुक्यातील नाटेगांव ग्रामपंचायतीसाठी केंद्र शासन अंतर्गत जल जीवन मिशन पाणी योजना मंजुर झाली असतांना सदर कामाचे भूमिपुजन आमदार आशुतोष काळे स्वतःच करत असून त्यांनी या योजनेचे श्रेय लाटू नये असे पत्रक सरपंच विकास मोरे उपसरपंच पुष्पाताई ताराचंद मोरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
     नाटेगाव ग्रामपंचायत सदस्यांना नाटेगाव पाणी योजना कामी विश्वासात घेतले नाही त्याचा निषेध म्हणून नाटेगांव रहिवासी व भाजपाच्यावतीने शुक्रवारी काळे झेंडे दाखविण्यांत येणार आहे असेही ते म्हणाले.
     याबाबतची माहिती अशी की,नाटेगांव साठी पिण्यांच्या पाण्यांची योजना मंजुर करण्याकामी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरवा केला.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदर १ कोटी ९६ लाख रूपये खर्चाच्या योजनेसाठी ६० टक्के निधी दिला त्यांचा आमदार काळे कुठेही नामोल्लेख करत नाही,ग्रामपंचायत स्तरावर सरपंच उपसरपंच सदस्यासह गांवक-यांना विश्वासात घेत नाही त्यामुळे शुक्रवारी नाटेगावात होणा-या कार्यक्रमादरम्यान आमदार काळे यांना काळे झेंडे दाखविण्यात येणार असुन पंचक्रोशीतील ब्राम्हणगांव येसगांव,बोलकी,आंचलगांव, खिर्डीगणेश,टाकळी आदि ठिकाणचे भाजपा कार्यकर्ते यात सक्रीय सहभाग घेणार आहेत असेही सरपंच विकास मोरे शेवटी म्हणाले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!