Homeकोपरगावतालुक्याची अर्थव्यवस्था टिकविण्यासाठी स्व.शंकरराव कोल्हे यांनी जिवाचे रान केले. - सुरेगाव जिल्हा...

तालुक्याची अर्थव्यवस्था टिकविण्यासाठी स्व.शंकरराव कोल्हे यांनी जिवाचे रान केले. – सुरेगाव जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत व सोसायटी सदस्यांचा विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार.

चासनळीच्या श्रीराम मंगल कार्यालयात सुरेगाव जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांचे हस्ते करण्यात आला

संपादक – राजेंद्र तासकर

                     माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी अभ्यासू वृत्तीने सात दशके कोपरगांव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पाटपाण्यांचा प्रश्न सोडवुन येथील पाणी,उस शेती व त्यावर अवलंबुन असणारी तालुक्याची अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सातत्यांने प्रयत्न केले असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. 
          तालुक्यातील चासनळी येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे शनिवारी सुरेगाव जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार विवेक कोल्हे यांचे हस्ते झाला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
           प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक मनेष गाडे,विलास वाबळे यांनी उपस्थीतांचे स्वागत केले.अशोकराव भाकरे यांनी प्रास्तविक केले.माजी संचालक भास्करराव तिरसे,चंद्रकांत चांदगुडे,संजय बोडखे,गोरक्षनाथ कोकाटे,सचिनशव वाबळे,कैलास माळी,बापू गाडे यांची यावेळी भाषणे झाली.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक आहेर यांनी स्व.शंकरराव कोल्हे यांना अभिवादन केले.याप्रसंगी संचालक राजेंद्र कोळपे,नरहरी तिरसे,संभाजीराव गावंड,अशोक माळी,राहुल वाणी,कल्याणराव चांदगुडे,शरद गडाख,सोपानराव कासार,शिवाजीराव घुमरे,सतिष बोरावके,प्रकाश वाघ,भाऊसाहेब भाफरे,बाजीराव मांजरे, बाळासाहेब अहिरे,विश्वनाथ बारगळ,विश्वास गाडे,मनोज गाडे, हर्षल गाडे,विनायक गाडे, बाळासाहेब भारती,डॉ.हेकरे, दौलत सोनवणे,जनार्दन कांगणे, संदिप बारगळ,सुभाष कांगणे, रमेश कांगणे,सखाहरी सोनवणे, साहेबराव सानप,अशोक सानप, संदिप उगले,बाळासाहेब सानप, संदीप उगले,कृष्णकांत सानप, एकनाथ काळे,शरद वाघ, प्रभाकर पारखे,संतोष सरडे, विजय जाधव,विजय साळुंके, विलास माळी,पांडुरंग पगार, शिवराम वाणी,भाऊसाहेब जाधव राजेंद्र कासार,चांगदेव शिंदे, रोहिदास शिंदे,साहेबराव वाबळे, सुकदेव गडाख,नेताजी गाडे, सखाहरी खडे,संपत ढोमसे, शाजित भगत,संदिप जगताप, भारत कासार,कैलास वरपे, सुदाम गाडे,माधव गोसावी,प्रसाद कोकाटे,संजय कोकाटे,सयाजी घुमरे,अमोल घुमरे,शरद कोकाटे, केशव कोकाटे,रामनाथ भोसले, साहेबराव तिरसे,किसन भोसले, राधाकृष्ण गवळी,उत्तम पायमोडे, एकनाथ गायखे,हरिष कोकाटे, सुनिल घुमरे,दिलीप बनकर, साहेबराव तनपुरे,केदार तनपुरे, दत्ता भोसले,सिताराम वाळके, गवाजी पवार,अशोक भोसले, सतिष भोसले,प्रशांत मोरे,दिपक पवार,हेमंत पंडोरे,प्रशांत वाबळे, पंकज निंबाळकर,राजेंद्र हळनोर, सोपानराव कदम,शांताराम मेहरखांब,उत्तम निकम,राजेंद्र शुक्ला,यशवंत निकम,छबुराव माळी यांच्यासह सुरेगांव पंचक्रोशीतील सर्व सोसायटी, ग्रामपंचायत सदस्य,कार्यकर्ते आदि उपस्थीत होते.
      श्री.विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की,दोन्ही साखर कारखाने तालुक्याच्या कामधेनु आहेत त्यातून रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध झाला.युवा वर्गाला काम मिळावे यासाठी आपण सावळीविहीर-संवत्सर येथील शेती महामंडळाच्या जमिनी चे ७/१२ उतारे काढून मतदार संघात मोठी औद्योगिक वसाहत सुरु करण्यासाठी उद्योग मंत्र्याकडे प्रस्ताव दिलेला आहे.
        संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी येथील प्रत्येकाच्या समस्या,दुःख जाणुन घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले आहेत.
          केंद्रात पंतप्रधान मोदी, सहकारमंत्री अमित शहा,नितीन गडकरी कार्यरत असुन त्यांच्याकडून कोपरगांवच्या प्रलंबित समस्या सोडविण्यांचे काम सुरु आहे;मात्र येथील लोकप्रतिनिधी फक्त बढ़ाया मारण्यात पटाईत असुन फोटोसम्राट आमदार म्हणून मिरवत आहे.अन्य तालुके दारणेच्या पाण्यावर हक्क सांगुन येथील शेती व गोदावरी कालवे उजाड करत आहे.तालुक्याची अर्थ व्यवस्था बंद पडू नये यासाठी स्व.शंकरराव कोल्हे यांनी १९६० मध्ये संजीवनी कारखान्याची उभारणी केली १९७० ते ८० च्या दशकात साखर उत्पादनाबरोबरच उपपदार्थ निर्मिती इंचा पाया संजीवनी घालून 14 वर्षे आधीच जागतिकीकरणाचे आव्हानाला सामोरे गेले,कारखान्याची गाळप क्षमता ८०० मे.टनावरून ६००० मे.टनापर्यंत वाढविली, शेतकऱ्याना कर्जमाफी मिळावी म्हणून स्व.शंकरराव कोल्हे यांनी अगोदरच मागणी करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली होती.मोदी शासन शेतकऱ्यांना दरवर्षी ९५ हजार कोटी रुपयांचा सन्मान निधी देत आहे. 
      माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी पाटपाण्याचे प्रश्न विधीमंडळात मांडून त्याची सोडवणूक केली मुकणे धरणाची उंची वाढवून त्यातून वाढीव अडीच टीएमसी पाणी गोदावरी कालव्यांना मिळवले.छोटतल्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी टीएमसीची भाषा शिकवली; शासन कुठलेही असो पण कोपरगावच्या हक्काच्या पाण्यासाठी स्व.कोल्हे रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास कधी डगमगले नाही,मात्र तत्कालीन आमदारांनी २००५ च्या समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याने गोदावरीचा ओव्हरफ्लो बंद केला, येथील शेती उध्वस्त झाली.
     निळवंडेचे पाणी कोपरगांव शहराला येणार होते,मात्र त्याला खो घालण्याचे पाप सत्ताधारी आमदाराने केले.कोळपेवाडी परिसरात कार्यकर्ते उभे राहणे अवघड आहे मात्र तळागाळातील नागरिकांनी संघटन मजबूत करत सतत कॉल यांना साथ दिली. 
                  सहकारी संस्था शेतकऱ्यांचा जीव की प्राण आहे तर ग्रामपंचायत विकासाचे केंद्र आहे तेंव्हा ग्रामीण भागाने यातुन प्रगती साधावी,सत्ता असो अगर नसो पण स्व.शंकरराव कोल्हे यांनी घालून दिलेल्या मुलमंत्राचा आधार घेऊन त्यानुरूप कार्यमग्न राहुन उपेक्षितांचे व या मतदार संघाचे प्रश्न सोडविण्याचा आपला आटोकाट प्रयत्न असून आगामी सर्व निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मदतीने विजयश्री खेचून आणूच असेही ते शेवटी म्हणाले. संचालक मनेष गाडे यांनी आभार मानले. 



    
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!