Homeनाशिकसिन्नरपंचाळे गडाख प्राथमिक विद्यालयात जिजामाता स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा व राष्ट्र मातेस...

पंचाळे गडाख प्राथमिक विद्यालयात जिजामाता स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा व राष्ट्र मातेस अभिवादन !!

संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
जिजाऊ या स्वराज्याची प्रेरणा होत्या.त्यांच्या वात्सल्यात स्वराज्याच्या लहानग्या रोपट्याचा वटवृक्ष झाला.स्वराज्यनिर्मिती ही एकच आस जन्मभर उराशी बाळगून ती पूर्णत्वास नेणाऱ्या राजमाता जिजाऊ आईसाहेबांना, त्यांच्या विचारांना,कर्तुत्वाला स्मृतिदिनी चिमुकल्यांनी अभिवादन करावे यासाठी माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनातून सुरू असलेल्या सिन्नर भूषण सूर्यभानजी गडाख प्राथमिक विद्यालय पंचाळे या विद्यालयात 17 जून राष्ट्रमाता, राजमाता,विश्वमाता मासाहेब जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेत,पोवाडे, गीत,भाषणे सादर करत अभिवादन केले.उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून मासाहेब जिजाऊंच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे शांताबाई,आर.एस. गडाख,स्काऊट समुपदेशक शिरोळे विश्वनाथ यांनी विशेष उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ थोरात, विनायक पगार,नलिनी लोखंडे, मयुरी हीवरडे,शितल नाजगड, अमोल व्यवहारे,अंजली डूंबरे, लता बेलोटे यांनी विशेष प्रयत्न केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!