Homeकोपरगावजेष्ठ नागरिक सेवा मंच व जेष्ठ महिला समिती आणि सुरभी हॉसिटल अ.नगर...

जेष्ठ नागरिक सेवा मंच व जेष्ठ महिला समिती आणि सुरभी हॉसिटल अ.नगर यांच्या संयुक्त विद्यमाने तीर्थंकर हॉस्पिटल कोपरगाव येथे लिव्हर व पोटाचे विकार रोग निदान शिबीर संपन्न

संपादक – राजेंद्र तासकर

      "जेष्ठ नागरिक सेवा मंच" व "जेष्ठ महिला समिती"आणि सुरभी हाॅस्पिटल अ.नगर यांच्या संयुक्त विद्यमाने तीर्थंकर हाॅस्पिटल कोपरगाव येथे"लिव्हर व पोटाचे विकार"यासाठी रोग निदान शिबीर देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरात डाॅ.वैभव अजमेरे (MD.DNB) यांनी रूग्ण तपासून मार्गदर्शन केले.
   याप्रसंगी डॉ.वैभव अजमेरे, डॉ.सौ.अजमेरे (Radiologist), डॉ.चिंतन कोठारी (Dermatologist) व डॉ. दीपाली अभिजीत आचार्य (आचारी) Cosmetologist  यांचा सत्कार करण्यात आला.
        शिबिराचे उद्धाटन प्रसंगी सुधाभाभी ठोळे,कैलास शेठ ठोळे,विजूभाऊ बंब,योगाचार्य उत्तमभाई शहा,डॉ वैभव अजमेरे, डॉ चिंतन कोठारी,सौ डॉ दिपाली आचारी,दत्तोपंत कंगले साहेब, दारूवाला पेंटर,पत्रकार हेमचंद्र भवर,गुजराथीताई,रोहोमताई, डॉ.सतीश अजमेरा,डॉ.अमोल अजमेरा आदी प्रतिष्ठित मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
                 सदर कार्यक्रमास गुजराथी ताई,डॉ.विलास आचारी, श्री.विजय शेठ बंब यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षा सौ.सुधाभाभी ठोळे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!