Homeकोपरगावसहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना निवडणुक ऐतिहासिक बिनविरोध,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन विवेकभैय्या कोल्हे...

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना निवडणुक ऐतिहासिक बिनविरोध,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन विवेकभैय्या कोल्हे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांची निवडणुक बिनविरोध पार पडल्याबददल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवानेते व जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांचा सत्कार केला.

संपादक – राजेंद्र तासकर

      सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याची निवडणुक ऐतिहासिक बिनविरोध झाल्याबददल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत त्यांचा सत्कार केला आहे. 
               सहकाराने ग्रामिण अर्थकारणाला मोठी दिशा दिली असून माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करत सहकाराच्या माध्यमांतुन देशाभिमानास्पद कामगिरी उभी केली आहे,त्यांचा हा वारसा युवानेतृत्व विवेकभैय्या कोल्हे यांनी समर्थपणे पुढे चालवावा असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले.
 सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांची निवडणुक ऐतिहासिक बिनविरोध झाल्याबददल गुरुवारी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी मंत्रालय मुंबई येथे भेट घेवून माहिती दिली त्याप्रसंगी फडणवीस यांनी कोल्हे यांचा सत्कार केला त्याप्रसंगी ते बोलत होते.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक बिनविरोध पार पडली. 
       श्री.देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,स्व.शंकरराव कोल्हे यांनी सात दशके समाजकारण करत त्यामाध्यमातुन अनेक लोकाभिमुख कामे केली. जिरायती भागातील छोटया छोटया शेतक-यांना बरोबर घेत त्यांच्या समस्या सोडवणुकीला सर्वोच्च प्राधान्य देत सहकाराला नावाप्रमाणे संजीवनी देत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातुन अनेक विकासाची फळे चाखायला दिली.शेती,पाणी आणि उस कारखानदारी व त्यावरील स्वयंरोजगार टिकविण्यांसाठी स्व.शंकरराव कोल्हे यांनी जीवापाड संघर्ष करत सहकारी संस्थाचे हित जोपासले.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनीही कोपरगांव पंचकोशीत सामाजिक कार्यातुन आलेख उंचावला आता युवानेते व कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांना समाजकारणाची संधी प्राप्त झाली असुन त्यांनी स्व.शंकरराव कोल्हे यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवुन देशात सहकाराच्या माध्यमांतुन शेतक-यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करून सुशिक्षीत बेरोजगारांच्या समस्या सोडवून कोपरगांवचे नांव आणखी मोठे करावे असेही ते म्हणाले. 


       
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!