Homeराहुरीशिवसेना अपंग सहाय्य सेना राहुरी तालुका दिव्यांगांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन - तालुकाप्रमुख...

शिवसेना अपंग सहाय्य सेना राहुरी तालुका दिव्यांगांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन – तालुकाप्रमुख संजय झांबरे

संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव,

        शिवसेना अपंग सहाय्य सेना राहुरी तालुका दिव्यांगांच्या  वतीने अहमदनगर जिल्हयांचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले साहेब यांना दिव्यांग,निराधार, विधवा,परितक्ता,श्रावण बाळ, जेष्ठ नागरिक यांचे केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने दर महिन्याला देण्यात येणारे रू१०००( एक हजार )अनुदान गेल्या तीन ते चार महिन्यापासून देण्यात आले नाही,तरी शासनाने लवकरात लवकर यावर उपाय योजना करून संबधीत तहसिल कार्यालयास थकीत अनुदान वरील लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यास कळवावे असे आशयाचे निवेदन शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुका प्रमुख संजय शामराव झांबरे व सौ.सुनिता संजय झांबरे महिला आघाडी प्रमुख यांनी दि.१५जुलै रोजी दिले.
         निवेदनात पुढे नमुद केले की,मागील 3 महिन्यापासून  संजय गांधी निराधार योजना, विधवा,श्रावण बाळ,जेष्ठ नागरिक,अंध -अपंगांचे अनुदान ( डोल ) वेळेत मिळालेले नाही तर राहुरी तालूक्यासह अहमदनगर जिल्हातील लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येते आहे, त्याचबरोबर सरासरी लाभार्थी हे शासनाच्या अनुदानावर अवलंबून असतात त्यांचा दैनंदिन खर्च,औषधोपचार व उदरनिर्वाह याच अनुदानावर अवलंबून असतो तरी शासनाने  तात्काळ सर्व अहमदनगर जिल्हयातील तहसीलदार व संबंधीत कार्यालयांना सूचना करून  थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर १५ दिवसाच्या आत वर्ग (जमा ) करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे व अंदोलना दरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहिल असे निवेदनात शेवटी म्हटले आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!