
संपादक – राजेंद्र तासकर
साडेचार महिन्याच्या नगराध्यक्ष पदाचाअविस्मरणीय कार्यकाळ कार्यकर्तुत्वाने कोपरगावच्या नावलौकिकात भर घालुन गावाचे नाव उज्वल करणारे,स्वतः सिव्हिल इंजिनियर असणारे शांत व संयमीवृत्तीने विचार करणारे विचारवंत, दूरदृष्टीकोन ठेवून विकासाच्या दृष्टीने नियोजन करणारे,शहराचे भूमीपूत्र व माजी.नगराध्यक्ष मंगेश माधवराव पाटील यांना त्यांच्या उल्लेखनिय कार्याचा गौरव म्हणून सकाळ वृत्तपत्र समुहाच्या वतीने "आयडॉल ऑफ महाराष्ट्र " या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रहार दिव्यांग शहराध्यक्ष प्रविण भुजाडे,प्रहार दिव्यांग जिल्हा संघटक परमेश्वर कराळे सर,शहर सचिव संदिपराव कवडे,पत्रकार राजेंद्र तासकर, प्रहार जनशक्ती कोपरगाव तालुकाध्यक्ष संदिप क्षीरसागर, महिला शहराध्यक्ष संगिताताई सोनवणे आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.
सत्कारमुर्ती पाटील सत्कारास उत्तर देतांना म्हणाले कि,आपण घरातील लहान मुलं आणि आई - वडील यांचा ज्याप्रमाणे सांभाळ करतो त्याप्रमाणेचं सर्वांनी दिव्यांगाचा सांभाळ केला पाहिजे,त्याला समाज प्रवाहात वावरतांना एक- एकट वाटल नाही पाहिजे, परमेश्वराने त्यांच्यावर अन्याय तर केलाच पण माणुसकीच्या नात्याने समाजाने त्यांच्याबरोबर सन्मानाने वागले पाहिजे,आपल्या बरोबरीने सन्मानाने जगण्याची हिंमत निर्माण केली पाहिजे, त्याचबरोबर यापुढे सत्ता असो अगर नसो दिव्यांगांबाबत असणाऱ्या अडीअडचणी आपण प्राधान्याने सोडविणार अशी ग्वाही दिली व उपस्थितांचे आभार मानले.