Homeकोपरगावपहिल्या श्रावण सोमवार निमित्त जगातील एकमेव गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात पूजा व...

पहिल्या श्रावण सोमवार निमित्त जगातील एकमेव गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात पूजा व आरती माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील व सौ.प्रियालक्ष्मी पाटील यांचे हस्ते संपन्न

संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजला जाणारा तसेच विविध धार्मिक उत्सवाची सुरुवात होते असा पावन व पवित्र “श्रावण”सुरू झाला आहे.त्या निमित्त गुरू शुक्राचार्य मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार निमित्त केल्या जाणाऱ्या पुजेसाठी कोपरगांव चे माजी. नगराध्यक्ष व सकाळ समुहा तर्फे दिला जाणारा “आयडॉल महाराष्ट्र”या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले श्री व सौ पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते.


त्यांच्या शुभ हस्ते पवित्र श्रावणी सोमवारच्या निमित्त महादेवाची, गुरु शुक्रचार्य महाराज व गंगा गोदावरी मातेची पूजा करण्यात आली.तसेच श्री व सौ पाटील यांचे हस्ते प्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी ट्रस्टच्या वतीने श्री व सौ पाटील यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,मंदिर प्रमुख सचिन परदेशी,सदस्य विशाल राऊत,विलास आव्हाड, दिलीपराव सांगळे,व्यवस्थापक राजाराम पावरा,पुजारी राजेंद्र कुलकर्णी,संजयजी रोडे,सौ. संगिता कुलकर्णी व भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंगेश पाटील यांनी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड व सर्व सन्माननीय सदस्य यांचा ते करीत असलेल्या गुरू सेवेच्या कार्याचा व मंदिर परिसर विकसित करून, जगातील एकमेव मंदिर जेथे संजीवनी मंत्राची महती आहे व जेथे कुठला ही मुहूर्त नसला तरी लग्न करता येतात असे हे महान स्थान,यांची माहिती जगभर पसरवण्यासाठी व कोपरगावचे नावलौकिक वाढवण्यासाठी करीत असलेल्या कामाबद्दल विशेष सत्कार केला.या वेळी पाटील यांनी त्यांना येणाऱ्या काळात बेटाचा रहात असलेला संपूर्ण परिसर/भाग व मंदिर परिसर विकसित करण्यसाठी शक्य तेव्हढे सहकार्य करणार असल्याचे सांगितले,जेणेकरून देव दर्शनासाठी पर्यटकांचा ओघ वाढेल व याचा उपयोग कोपरगावची बाजारपेठ वाढीसाठी होईल असे पाटील यांनी शेवटी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!