
संपादक -राजेंद्र तासकर
माणसाने मधमाशी प्रमाणे रोज थोडी थोडी आर्थिक बचत करून भविष्य उज्ज्वल केले पाहिजे आपली मुले लहान आहेत तोपर्यंत आर्थिक बचत करून त्यांच्या व आपल्या भविष्यातील अडचणींना तोंड देता येईल अशी तरतूद केली पाहिजे असे विचार साहित्यिक हेमचंद्र भवर यांनी व्यक्त केले.
बंब प्लाझा येथील श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीच्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समारंभात हेमचंद्र भवर बोलत होते.समारंभाच्या अध्यक्षस्थानी संचालक नितीन चंद्रकांत भालेराव हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून सी.ओ.हरिश्चंद्र अंबादास मोरे,लिगल अॅडवटायझर पराग देशमुख,प्रशासकीयअधिकारी कार्तिक पुनगोंटीवार,सिनिअर मॅनेजर दत्ता अंकरम हे उपस्थित होते.
शाखा व्यवस्थापिका सौ.अनुराधा रणदिवे यांनी मान्यवरांचे स्वागत केले व प्रास्ताविकेत म्हटले कि,शाखेच्या वतीने शिक्षक दिन,अभियंता दिन,पुस्तक दिन,चाॅकलेट डे, मातृदिन आदि उपक्रम राबविले गेले आहे त्याचबरोबर बचत खाते,मुदतीच्या ठेवी व कर्ज योजना आदी विषयांवर वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते असे विचार व्यक्त करण्यात आले.
वर्धापनदिनानिमित्त अनेक ग्राहकांनी संस्थेच्या शाखेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
समारंभाच्या यशस्वीतेसाठी शाखेचे वाघ,आदमाने,सोनवणे, बत्रा आदींनी परिश्रम घेतले.
