Homeकोपरगावजेष्ठ नागरिक सेवा मंचचे वतीने शालेय साहित्य वाटप संपन्न

जेष्ठ नागरिक सेवा मंचचे वतीने शालेय साहित्य वाटप संपन्न

संपादक – राजेंद्र तासकर

   जेष्ठनागरिक सेवा मंच,जेष्ठ महिला समितीचे वतीने कोपरगाव नगरपालिका मा.माधवरावआढाव माध्यमिक व मराठी शाळा नंबर सहा मधील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले,स्वागत प्रास्ताविक सौ.भावना गवांदे यांनी केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून स्मृतींना अभिवादन करण्यात आले, त्यावेळी महिला समितीच्या अध्यक्षा सौ.सुधा भाभी ठोळे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या कि, गरिब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
          सदर समारंभासाठी रजनीताई गुजराथी,सौ.शैलजा रोहोम,डॉ.वर्षा झंवर,ह.भ.प.थोरे महाराज,डॉ.विलास आचारी, पेंटर दारूवाला,शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.
   या प्रसंगी डॉ.वर्षा झंवर व डॉ.विलास आचारी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न जीवनासाठी मार्गदर्शन केले. 
            जेष्ठ नागरिक सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष कै. भागचंदभाऊ ठोळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम आजही सुरू असल्याने जेष्ठ नागरिक सेवा मंच,जेष्ठ महिला समिती व ठोळे परीवाराचे शैक्षणिक संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक वानखेडे सर यांनी आभार मानले.
   सदर कार्यक्रमास उपस्थित  सर्वांचे उत्तमभाई शहा यांनी शेवटी आभार मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!