
संपादक – राजेंद्र तासकर
जिद्द आणि चिकाटी असेल तर उत्तुंग भरारी घेता येते असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले.
आशियाई पतसंस्था फेडरेशनच्या सदस्य व खजिनदार पदी समता पतसंस्थेचे मा. काकासाहेब कोयटे यांची निवड झाल्या बद्दल लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी पोळ पुढे म्हणाले की, सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेऊन काकासाहेब कोयटे यांनी जिद्द, चिकाटी व मेहनत यांच्या माध्यमातून उत्तुंग भरारी घेतली असून कोपरगाव शहराच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे काकासाहेब कोयटे यांच्याकडून कोपरगाव शहराच्या विकासात नेहमीच व्यापारी,मजूर,कष्टकरी यांना सहकार्य केले जाते त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन शहर विकास साध्य करण्यासाठी व कोपरगाव शहराचा नावलौकिक सातासमुद्र पार नेण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करावे असे वाटते.
या वेळी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ दलित मित्र मा.राजेंद्र बागुल,ज्योती पतसंस्थेचे मा. रविकाका बोरावके,माजी नगरसेवक सोमनाथ म्हस्के,सुजल चंदनशिव,अमीन शेख आदी उपस्थित होते.