Homeकोपरगावसमाजकार्यासाठी स्व.शंकरराव कोल्हे यांनी जीवन समर्पित केले- सौ.स्नेहलताताई कोल्हे.

समाजकार्यासाठी स्व.शंकरराव कोल्हे यांनी जीवन समर्पित केले- सौ.स्नेहलताताई कोल्हे.

चांदेकसारेत १९ बेघर कुटुंबाना घरकुलासाठी सौ कोल्हे यांच्या हस्ते मोफत जागेचे वाटप.

चांदेकसारे ग्रामपंचायतीने गरीब व भटक्या विमुक्त जातीतील नंदीवाले १९ कुटुंबांना घरकुलासाठी जागा दिली त्याचे सातबारे उतारे भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

संपादक – राजेंद्र तासकर

    समाजकार्यासाठी संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी आयुष्य समर्पित केले,शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला.संजीवनी एज्युकेशनच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण दिले त्यामुळे ग्रामीण भागातील मुले देखील देशासह परदेशात उच्च पदावर काम करत असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.तालुक्यातील चांदेकसारे येथे १९ बेघर कुटुंबाना मोफत जागेचे वाटप करताना बोलत होत्या. 
  यावेळी सदगुरु संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट नेवासेचे अंकुश महाराज जगताप,माजी आमदार स्नेहलता कोल्हे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव,संचालक ज्ञानेश्वर होन,बाबासाहेब वक्ते,माजी सरपंच केशवराव होन,माजी संचालक संजयराव होन, अरूणराव येवले,शिवाजीराव वक्ते,संचालक ज्ञानदेव औताडे, विश्वासराव महाले,निलेश देवकर, रमेश आभाळे,निवृत्ती बनकर, बापुसाहेब बारहाते,प्रकाश बारहाते,अशोकराव औताडे, सरपंच पुनम खरात,उपसरपंच विजय होन,अशोक होन, रावसाहेब होन,आण्णासाहेब चव्हाण,आप्पासाहेब औताडे, कांतीलाल होन,मनोहर शिंदे, गणपत दवंगे,जालिंदर चव्हाण, चंद्रकांत होन,आप्पासाहेब होन, प्रल्हाद होन,रंगनाथ लोंढे,वसंत थोरात,ह भ प.निलोबा महाराज सुर्यवंशी,गणेश गोंडे,सुनिल पारे, अशोक महाराज,विश्वनाथ जावळे,शिवाजी जावळे,शामराव जावळे,योगेश जावळे,पिन्टुभाऊ होन,भाऊसाहेब होन,सोमनाथ होन,प्रभाकर होन,किशोर होन,दहे महाराज,श्री पवार,विनायक आढेराव आदीसह चांदेकसारे पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते. 
        सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक बिपिन कोल्हे,अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदेकसारे ग्रामपंचायतीने वीस ते पंचवीस वर्षापासून गावात राहत असलेल्या गरीब व भटक्या विमुक्त जातीतील नंदीवाले १९ कुटुंबांना घरकुलासाठी आपल्या हक्काची जागा मिळण्यासाठी प्रयत्न केले. 

माजी सरपंच केशवराव होन यांनी सरपंच पूनम खरात उपसरपंच विजय होन व ग्रामपंचायत सदस्य यांना बरोबर घेत गावात मोकळी असलेली शासकीय जागेसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करत या गरजू १९ बेघरांना आपल्या हक्काची जागा उपलब्ध करून दिली.जागेच्या सातबारा या कुटुंबाच्या नावावर करून देण्यात आला.सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते बेघर कुटुंबातील सदस्य काळू सयाजी पवार, नानासाहेब सयाजी पवार,सुरेश दत्तू हटकर,बाबू दगडू हटकर आदिना सातबारा उताराचे वाटप करण्यात आले,तर बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील महिला व नागरिकांनी डोळ्याची तपासणी केली होती त्या रुग्णांना मोफत चष्म्याचेही वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना अंकुश महाराज जगताप यांनी सांगितले की माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी जीवनात खूप मोठी क्रांती केली.क्रांती म्हणजे जे कोणाला शक्य नाही ते करायचं आणि केलेलं जगाच्या कल्याणासाठी लावायचं.हेच काम स्व.शंकरराव कोल्हे यांनी केले. शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांनी लढा दिला पाट पाण्यासाठी त्यांनी रूमनं मोर्चा काढला होता.तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी खूप मोठं काम केलं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कोल्हे परिवार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
बेघर कुटुंबांना सातबारा उतारा मिळाल्याने त्यांना आनंदअश्रू आवरता आले नाही.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माजी सरपंच केशवराव होन यांनी केले.

      
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!