Homeकोपरगावपंजाब येथे होणाऱ्या ३५व्या राष्ट्रीय बेसबाॕल स्पर्धासाठी महाराष्ट्राचा संघ रवाना

पंजाब येथे होणाऱ्या ३५व्या राष्ट्रीय बेसबाॕल स्पर्धासाठी महाराष्ट्राचा संघ रवाना

संपादक – राजेंद्र तासकर

महाराष्ट्र बेसबॉल असोशिएनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा असोशिएनच्या वतीने एस.एस. जी.एम.काॕलेज कोपरगांवच्या मैदानावर महाराष्ट्राच्या पुरुष संघांचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर नुकतेच आयोजित केले होते. १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर काॕलेजच्या मैदानावर संपन्न झाले.
या शिबिराचे उदघाटन महाविदयालयाचे प्राचार्य श्री. सानप सर यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय व्हाॕलीबाॕल प्रशिक्षक श्री.राजेंद्र कोहकडे,एस.एस.जी. एम काॕलेजचे आॕफीस सुपरीडेंट श्री.सुनिल गोसावी हे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या प्रशिक्षणाचा समारोप नुकताच संपन्न झाला.
महाविदयालयाचे प्राचार्य सानप सर यांनी या संघाला हार्दीक शुभेच्छा दिल्या.बेसबाॕल असो.अध्यक्षअरुण चंद्रे यांनी यावेळी बोलतांना महाविदयालयाला खेळाची खुप थोर परंपरा आहे.तीजोपासण्याची आपली सर्वाची जबाबदारी आहे असे स्पष्ट करुन या संघाला शुभेच्छा दिल्या.बेसबाॕल असो. सचिव श्री.मकरंद को-हाळकर यांनी या बेसबाॕल संघात कोपरगांवचे तीन खेळाडु असल्याची माहीती देवुन हा संघ राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त करील अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रीय व्हाॕलीबाॕल प्रशिक्षक राजेंद्र पाटणकर,मळेगांव थडीचे प्रगतशील शेतकरी खोंड,के.जे. सोमय्या काॕलेजचे वरिष्ठ क्रीडा संचालक प्रा.सुनिल कुटे,कनिष्ठ महाविदयालयांचे मिलींद कांबळे, एस.एस.जी.एम चे क्रीडा संचालक साठे,संघाचे प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे,नांदेडचे राष्ट्रीय पंच आनंदा कांबळे आदि मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
फगवाडा,जालंदर पंजाब येथे होणाऱ्या ३५व्या राष्ट्रीय बेसबाॕल स्पर्धासाठी हा संघ नुकताच झेलम एक्सप्रेसने रवाना झाला.या संघाला महाराष्ट्र बेसबाॕल असो.सचिव राजेंद्र इखणकर,अहमदनगर जिल्हा बेसबाॕल संघटनेचे अध्यक्ष अरुण चंद्रे,सचिव मकरंद को-हाळकर, सदस्य अंबादास वडांगळे,राजेंद्र पाटणकर प्राचार्य सानप आदिनी शुभेच्छा दिल्या आहे.
या संघात पुढील खेळाडुंचा समावेश आहे : -अक्षय आव्हाड- कोपरगाव,शमित माळी -कोपरगाव,कन्हैया गांगुले -कोपरगाव,मुस्तकिम पिरजादे -नगर,नंदन परब -मुंबई,प्रदिप पाटील – मुंबई,सिताराम भांड -सोलापूर,तुषार ललवानी -मुंबई उपनगर,अक्षय मोगल -नाशिक, आकाश वण्णे -पुणे,संतोष कचरे -पुणे,ऋषिकेश राऊळ -मुंबई, किशोर काळे -बिड,आकाश साबणे – परभणी,रविराज साळवे – जळगाव,विनित सकपाळ -मुंबई,रोहित चव्हाण -औरंगाबाद,
अक्षय हावळे -सोलापूर.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!