Homeकोपरगावशिर्डी-काकडी विमानतळावर हज हाउस उभारावे-खालीकभाई कुरेशी

शिर्डी-काकडी विमानतळावर हज हाउस उभारावे-खालीकभाई कुरेशी

संपादक – राजेंद्र तासकर

           अहमदनगर जिल्हयात साईबाबांची शिर्डी हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे धार्मीकस्थळ असुन कोपरगांव तालुक्यातील मौजे काकडी येथे विमानतळाची उभारणी करण्यांत आलेली आहे. अहमदनगर जिल्हयातुन मुस्लीम बांधव हज यात्रेस मोठया प्रमाणांत या विमानतळाचा वापर करतात मात्र सदर ठिकाणी हज हाउस नसल्याने त्यांच्या सोबतच्या सहका-यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे तेंव्हा काकडी विमानतळावर हज हाउस उभारण्यांत यावे अशी मागणी कोपरगांव शहर भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष खालीकभाई कुरेशी यांनी केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री नामदार प्रल्हादसिंग पटेल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
         भाजपाच्या प्रदेश सचिव सौ.स्नेहलताताई कोल्हे जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली कोपरगांव शहर व तालुक्यातील मुस्लीम बांधवांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल कोपरगांव दौ-यावर आले असता भेट घेतली त्यात हे निवेदन देण्यांत आले. 
         या निवेदनात पुढे म्हटले की,साईबाबा तीर्थस्थानावर सर्वधर्मीय भाविक दर्शनांसाठी देश विदेशातुन येत असतात. मुस्लीम बांधवांची पवित्र यात्रा हज असून त्यासाठी यापूर्वी मुंबई औरंगाबाद विमानतळाचा आधार घेवुन विमान प्रवास करावा लागत होता,आता मात्र अहमदनगर जिल्हयात काकडी येथे प्राधिकरणांने विमानतळ उभारले आहे,साईभक्तांसह सर्वांनाच विमानप्रवासाचा लाभ घेता येतो. अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाने मोठा आहे,येथे मुस्लीम बांधवांची संख्या सर्वाधिक आहे.पवित्र हज यात्रेस ये जा करणा-याभाविकांना काकडी विमानतळावर हज हाउस बांधल्यास त्याचा फायदा होईल असे ते शेवटी म्हणाले.     याप्रसंगी भाजपा अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष फकीर महंमद पहिलवान,सरचिटणीस असिफ इमाम शेख,हाजी सद्दामभाई सय्यद,नसीरभाई सय्यद,हाजी अल्ताफ कुरेशी,उसिफ शेख, एस.सी.सलीम,अन्वरभाई शेख, शब्बीरभाई इनामदार,इलियास शेख यांच्यासह मुस्लिम बांधव आदि उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!