Homeकोपरगावकेंद्र सरकारच्या निधीतून झालेल्या कामांचे फुकटचे श्रेय घेण्याचा आमदाराचा प्रयत्न - युवा...

केंद्र सरकारच्या निधीतून झालेल्या कामांचे फुकटचे श्रेय घेण्याचा आमदाराचा प्रयत्न – युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी साधला निशाणा

संपादक – राजेंद्र तासकर

       केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना,जलजीवन मिशन यासारख्या योजनांमधूनकोपरगाव विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी घरकुल व पाणीपुरवठा योजनांची कामे झाली आहेत. पंतप्रधान आवास योजनेतून अनेक गरजू लोकांना हक्काचे नवीन घर मिळाले आहे.  जलजीवन मिशनअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून अनेक गावांतील पाण्याचा प्रश्न सुटला आहे.ही सर्व कामे केंद्र सरकारच्या निधीतून झाली असतानादेखील स्थानिक आमदार मात्र आपल्या प्रयत्नामुळे ही कामे झाल्याचे जनतेला खोटे सांगून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे,अशी टीका करत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
       भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभा प्रवास योजना या उपक्रमांतर्गत केंद्रीय जलशक्ती आणि अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात शनिवारी (१० सप्टेंबर) आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे महसूल व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपच्या प्रदेश सचिव तथा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे,भाजपचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी तथा चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर,भाजपचेजिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,संघटनसरचिटणीस नितीन दिनकर,भाजपचे प्रांतिक सदस्य रवीकाका बोरावके, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे,दीपक चौधरी,अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे कोपरगाव तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,शहराध्यक्ष डी. आर.काले,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक,शरद नाना थोरात,भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वैशाली साळुंके आदी उपस्थित होते.     
          भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी प्रास्ताविकात केंद्र व राज्य सरकारने कोपरगाव विधानसभा मतदारसंघात केलेल्या विविध कामांची माहिती दिली. सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांचे कोपरगाव तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे.पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान,पंतप्रधान आवास योजना,आयुष्यमान भारत,जलजीवन मिशन यासारख्या अनेक लोक कल्याणासाठी योजना सुरू केलेल्या आहेत.या योजनांमुळे देशातील सर्वसामान्य लोकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.पंतप्रधान मोदी यांनी ‘हर घर जल’ही घोषणा देत सन २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे.केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालया मार्फत राबविण्यात येतअसलेल्या ‘जलजीवन मिशन’अंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ७१ ग्रामपंचायतींना २७७ कोटींचा निधी या खात्याचे राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी उपलब्ध करून दिलेला आहे.केंद्र सरकारच्या या निधीतूनच या ७१ गावांतील पाणीपुरवठा योजनांचे काम झाले आहे.पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या ‘पंतप्रधान आवास योजने’च्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील अनेक गरजू लोकांना घरे मिळाली.ही वस्तुस्थिती आहे;परंतुकोपरगावचे स्थानिक आमदार मात्र याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनतेची दिशाभूल करीत आहेत. न केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याची त्यांना जणू सवयच लागली आहे,उपरोधिक टोला मारत आमदाराचा हा खोटेपणा आणि मतलबी राजकारण जनतेने लक्षात घेतला पाहिजे, असे विवेकभैय्या कोल्हे म्हणाले. केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी आमदाराचा हा खोटेपणा उघड केला याबद्दल कोल्हे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करत आहे.भारतीय जनता पक्षात शिस्तीला अत्यंत महत्त्व आहे. कार्यकर्त्याला महत्त्वाचे स्थान आहे.भारतीय जनता पक्ष हा श्रेयासाठी काम करत नाही तर विकासाला महत्त्व देतो हे कार्यकर्त्यांनी लोकांना पटवून दिले पाहिजे.भाजपचेपदाधिकारी, बुथ व शक्ती केंद्रप्रमुखांनी केंद्र सरकारने केलेल्या कामांची स्वतंत्र यादी करून सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा घरोघरी जाऊन प्रसार करावा.त्यातून मतदाराचा विश्वास संपादन करावा.सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकी बरोबरच आगामी काळातील सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत.शिर्डी लोकसभा आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे.त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी निर्धारपूर्वक कामाला लागावे, असे आवाहन पटेल यांनी केले.
महसूल व पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले असून,कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी निळवंडे धरणातून थेट कोपरगावपर्यंत बंदिस्त पाईपलाईनमधून पाणी आणण्याच्या योजनेला गती दिली जाईल.तसेच निळवंडे कालव्या द्वारे शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रश्न येत्या सहा महिन्यांत सोडविण्यात येईल.आगामी निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचाच आमदार आणि तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाजपचाच खासदार निवडून येईल आणि ती आपली जबाबदारी राहील.यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी सुरू करावी,असे आवाहन त्यांनी केले.मेळाव्यास प्रदीप नवले,मच्छिंद्र टेके,सतीश रानोडे, कैलास खैरे,माजी नगरसेवक विजय वाजे,बबलू वाणी,स्वप्नील निखाडे,जनार्दन कदम,दिनेश कांबळे,अल्ताफभाई कुरेशी, दीपक जपे,शिवाजी खांडेकर, वैभव गिरमे,विवेक सोनवणे, फकीरराव बोरणारे,कानिफनाथ गुंजाळ,इलियास खाटिक,सुशांत खैरे,किरण सुपेकर,भाजप अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा प्रभारी विनोद राक्षे,जितेंद्र रणशूर,अल्पसंख्याक आघाडीचे खलिकभाई कुरेशी,फकीर मोहम्मद पैलवान,वैभव आढाव, गोपीनाथ गायकवाड,प्रसाद आढाव,दादासाहेब नाईकवाडे, जगदीश मोरे,वासुदेव शिंदे, विजय चव्हाणके,सोमनाथ मस्के, सिद्धार्थ साठे आदींसह भाजप बुथप्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख, संजीवनी उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी संचालक,भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!