
मुख्य संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगांव येथिल श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत १५ आॕक्टोंबर माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॕ.अब्दुल कलाम यांची जयंती हा वाचन-प्रेरणा दिवस म्हणून उत्साहाने संपन्न झाला.
श्री.गो.विदयालयात भारतरत्न माजी राष्ट्रपती डाॕ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्यु.सोसायटीचे सचिव श्री.दिलीपकुमार अजमेरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी शिक्षण प्रक्रियेत वाचन प्रकल्पाचे महत्व सांगुन आजच्या तंत्रज्ञानामध्ये जो पुस्तक वाचेल तोच शिकेल असे स्पष्ट केले.व हात धुवा दिना निमित्तानं वारंवार हात धुण्याचे महत्त्व समजावुन सांगितले.
विदयालयांचे उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड यांनी डाॕ.अब्दुल कलाम यांच्या विविध घटनांचा संदर्भ देत त्यांच्या अग्निपंख ह्या पुस्तकाचा अभ्यास करा असे सांगितले.ग्रंथपाल आव्हाड ए.एल यांनी विदयार्थींना विविध पुस्तकांच्या पी.डी.एफ.फाईल स्वरुपात वाचनासाठी उपलब्ध करुन दिल्या.
विदयालयांचे पर्यवेक्षक यु.एस.रायते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन ए.के.काले यांनी तर आभार जेष्ठ क्रीडा शिक्षक एन.के.बडजाते यांनी मानले.
संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे,संदीपअजमेरे,राजेश ठोळे आदीनी वाचन-प्रेरणा दिवसांच्या विदयार्थी,शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला शिक्षक व कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.