Homeकोपरगावलक्ष्मण देवकर यांना अपघात मदत विमा पन्नास हजार रूपयांचा धनादेश प्रदान -संजीवनी...

लक्ष्मण देवकर यांना अपघात मदत विमा पन्नास हजार रूपयांचा धनादेश प्रदान -संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने सभासद व कर्मचा-यांसाठी प्रत्येकी दोन लाख रूपयांचा अपघात विमा न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन उतरविला असुन त्याअंतर्गत सभासद लक्ष्मण देवकर यांना संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते पन्नास हजार रूपयांचा धनादेश प्रदान करण्यांत आला.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

       तालुक्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे सभासद व कर्मचा-यांचा कारखाना व्यवस्थापनाने प्रत्येकी दोन लाख रूपयांचा अपघात विमा न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन उतरविला असुन कारखान्यांचे सभासद लक्ष्मण आनंदा देवकर यांचा रस्ते अपघात झाला असता त्यांना वैद्यकिय उपचारार्थ पन्नास हजार रूपयांचा विमा धनादेश संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यांत आला. 
                श्री.बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद, कामगारांसाठी कारखान्याने न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडून अपघात विमा पॉलीसी उतरविली आहे.अपघात समयी विमा प्रत्येकाला एक महत्वाचा आधार असतो.आतापर्यंत या योजनेतुन असंख्य सभासद कर्मचा-यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवुन दिला आहे. टाकळी येथील कारखान्यांचे सभासद श्री. लक्ष्मण आनंदा देवकर यांचा रस्ते अपघात झाला होता, त्याबाबत कारखाना व्यवस्थापनाने आवश्यक ती कागदपत्रे पुर्ण करून न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडे त्याचा पाठपुरावा केला व त्यांना विमा पॉलीसीच्या माध्यमातुन पन्नास हजार विमा रक्कम मदत केली त्याचा धनादेश सोमवारी सुपुर्द केला. शेवटी श्री. देवराम देवकर यांनी आभार मानले. 


        
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!