Homeकोपरगावसोने आणि कपडे खरेदीसाठी खुबानी परिवाराने कोपरगावकरांसाठी हक्काचे दालन खुले केलेले आहे...

सोने आणि कपडे खरेदीसाठी खुबानी परिवाराने कोपरगावकरांसाठी हक्काचे दालन खुले केलेले आहे – श्री.फत्तेचंद रांका,अध्यक्ष

 मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव शहरात १९६८ मध्ये सराफ बाजार रोड लगत खुबानी ज्वेलर्स या नावाने एका छोट्या दालनानंतर २०१० मध्ये माझ्या आणि समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे यांच्या हस्ते कोपरगावकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे या दालनाला गुरुद्वारा रोड लगत भव्य स्वरूप देण्यात आले.आज या दालनाला ५४ वर्ष पूर्ण झाली असून कोपरगावकरांसाठी गुणवत्ता पूर्ण सोने खरेदीचे हक्काचे दालन बनले आहे.हे सारे शक्य झाले आहे ते या यांनी स्वीकारलेल्या बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच वेगवेगळ्या व्हरायटी, सोने व कपड्यातील गुणवत्ता यासारख्या विविध गुणांचा खुबानी परिवाराने स्वीकार केल्याने. काळाची पाऊले ओळखून व्यवसायात केलेला बदलामुळे शक्य होत आहे.हे सातत्य खुबानी परिवाराने सोने आणि कपडे व्यवसायातही भविष्यात ठेवावे.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष श्री.फत्तेचंद रांका यांनी केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात सोनेतारण विभागाच्या वतीने सोने मुल्यांकन करणाऱ्या मुल्यांकारांसाठी १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्या प्रसंगी रांका हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यानंतर कोपरगाव शहरात श्री.तुलसीदास खुबानी यांच्या मार्गदर्शनाखाली चालविण्यात येत असलेल्या खुबानी ज्वेलर्स सोने आणि दीड वर्षात प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेले एस. एस.के.स वॉर्डरोब या कपडे विक्रीच्या दालनास सदिच्छा भेट दिली.रांका यांच्या सोबत सारसबाग पुणा क्लबचे अध्यक्ष श्री.अनिल संचेती,कोठाडीया, आणि शहा यांचा ही सत्कार करण्यात आला.
प्रसंगी श्री.फत्तेचंदजी रांका यांचा यथोचित सत्कार खुबानी परिवाराच्या वतीने करून सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थापक श्री.तुलसीदास खुबानी,खुबानी परिवारातील श्री. रिंकेश खुबानी,सौ.शालिनी खुबानी, श्री.तरुण खुबानी,सौ.सिमरन खुबानी, श्री.निखिल खुबानी,सौ.चाहत खुबानी आदींसह ज्वेलर्स मधील कर्मचारी, ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!