Homeकोपरगावजिल्हा रुग्णालयाकडुन दिले जाणारे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आता तालुका निहाय शिबिराचे आयोजन

जिल्हा रुग्णालयाकडुन दिले जाणारे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आता तालुका निहाय शिबिराचे आयोजन

मुख्य संपादक – राजेंद्र तासकर

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने दिले जाणारे दिव्यांग प्रमाणपत्र साठी तालुका निहाय शिबीर आयोजन करण्यात येणार आहे.राहुरी व नगर तालुक्यातील दिव्यांग बांधवाना  नवीन प्रमाणपत्र काढणे साठी शिबीर शुक्रवार दिनांक 4/11/2022रोजी सकाळी 9ते 1या वेळेत सिव्हील हाॅस्पीटल अहमदनगर येथे आयोजित केला आहे.अशी माहिती राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी प्रशासनाच्या वतीने दिली आहे. 
   अहमदनगर जिल्हयातील दिव्यांग बांधवांची संख्या जास्त आहे.त्यामुळे जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे दर बुधवार व्यतिरिक्त दर शुक्रवारी सकाळी ९ ते १२ या वेळेमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचे कामकाज दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ पासून चालू राहिल. यासाठी संबंधी दिव्यांग व्यक्तींनी दोन पासपोर्ट साईज फोटो,रेशन कार्ड (मुळ प्रतीसह),आधार कार्ड व इतर औषधोपचारांच्या कागदपत्रांच्या झेरॉक्सप्रती सोबत आणाव्यात.तसेच ज्या दिव्यांग व्यक्तींनी प्रमाणपत्रासाठी "ए" पार्ट भरलेला आहे त्यांनी मुळ एस.ए.डी.एम. प्रमाणपत्र व भरलेल्या फॉर्मची प्रत सोबत घेवून यावी.
  त्याचप्रमाणे दि. ४.११.२२ रोजी राहुरी व नगर, दि.११.११.२२रोजी अकोले व संगमनेर,दि. १८.११.२२ रोजी राहाता व कोपरगाव,दि.२५.११. २२ रोजी नेवासा व शेवगाव, दि.२. १२.२२ रोजी पाथर्डी व श्रीगोंदा,दि.९. १२.२२ रोजी जामखेड व कर्जत,दि. १६.१२.२२ रोजी पारनेर व श्रीरामपूर या प्रमाणे तालुकानिहाय शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे तरी गरजू दिव्यांग व्यंक्तींनी याची नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे.
                ज्या दिव्यांग बांधवाना आजपर्यंत ऑनलाईन प्रमाणपत्र मिळाले नाही अशा दिव्यांग बांधवानी प्रमाणपत्र शिबीराचा लाभ घ्यावा. कोणीही दिव्यांग या लाभापासून वंचित राहणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी त्यामुळे सर्व दिव्यांगाना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेता येणार आहे.
    शिबीरास येताना दोन पासपोर्ट साईज फोटो,आधार कार्ड,रेशन (कार्डसत्यप्रत),औषध उपचार कागदपत्र सोबत आणवे ही विनंती.
    यावेळी राहुरी प्रहार तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे,सचिव योगेश लबडे, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, सल्लागार सलीम शेख,संपर्कप्रमुख रवि भुजाडी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!