Homeकोपरगावमाजी सभापती भागवतराव काळवाघे यांचे निधन

माजी सभापती भागवतराव काळवाघे यांचे निधन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

       कोपरगांव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती भागवत यमाजी काळवाघे (९०) यांचे निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी,तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या कामगार विभागाचे चौकशी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.     सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अभियंता किरण,बांधकाम व्यवसायिक हर्षल यांचे ते वडील होते. 
             कै.भागवतराव काळवाघे यांच्या पार्थीवावर शिंगवे येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले.१९८१ ते १९८६ या काळात त्यांनी तालुका पंचायत समितीचे सभापती,श्रीगणेश सहकारी साखर कारखान्यांचे संचालक तर माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे विश्वासु सहकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले.१९७४ ते २०२२ या ४८ वर्षाच्या कालावधीत त्यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या कामगार विभागाचे चौकशी अधिकारी म्हणूनही काम पाहिले होते. सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्राशी त्यांचा निकटचा संबंध होता.राहाता तालुक्यातील शिंगवे गांवचे सुपुत्र तर ग्रामपंचायत सोसायटीचे सदस्य म्हणूनही त्यांच्या कार्याचा लौकीक होता.त्यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे,संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे,जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे आदिंनी शोक व्यक्त केला.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!