Homeनाशिकसिन्नरMPSCमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शरद जाधव यांचा...

MPSCमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शरद जाधव यांचा यशोचित सत्कार

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

 श्री कालभैरवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिन्नर तालुक्यातील शहा गावच्या पवित्र भूमीतील भूमिपुत्र, गावचा मान,जाधव कुटुंबियांची शान, शरद नवनाथ जाधव यांचा MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल यथोचित असा सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी सिन्नर तालुक्याचे माजी. आमदार मा.राजाभाऊ वाजे,शहा गावच्या सरपंच आदरणीय शुभांगीताई जाधव,सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच एस.डी.जाधव इंग्लिश मीडियमस्कूलचे संस्थापक मा संभाजी जाधव सर, तसेच एस.डी.जाधव इग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल मा.निळकंठ सर व सर्व स्टाफ आणि पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
          सदर कार्यक्रमाची प्रस्तावना मा.संभाजी जाधव सर यांनी केली व म्हणाले की,श्री कालभैरवनाथांची कृपा,जाधव कुटुंबियांचा आशीर्वाद, सर्व गावातील नागरिकांचे सहकार्य, मित्रांचे मित्र प्रेम व शरद यांचे कठीण परिश्रम या सर्वांमधून हे यश प्राप्त झाले आहे.  
 मा.माजी.आमदार राजाभाऊ वाजे यांनी शरद जाधव यांना शुभेच्छा देत, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालयाचा वापर करावा कारण वाचनालय हे विद्यार्थ्यांच्या यशापर्यंत घेऊन जाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असा मोलाचा संदेश दिला.     
       पुढे बोलतांना मा.आ.श्री.वाजे म्हणाले कि,विद्यार्थी व तरुणांसाठी सिन्नर येथे ना नफा ना तोटा या तत्त्वावर भव्य दिव्य अशा वाचनालयाची सुरुवात देखील केलेली आहे.त्याचा विद्यार्थ्यांनी वापर करून आपल्या ज्ञानात भर घालावी.
          सदर वाचनालयासाठी शरद जाधव यांचे वडील नवनाथ जाधव यांनी एक खारीचा वाटा म्हणून आजचा सुवर्णयोग साधून ५००१ रु. देणगी वाचनालयासाठी मा.आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे सुपूर्द केली.

          तसेच एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री. निळकंठ सर व शहा गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक यांनी प्रातिनिधिक स्वरूपात शरद जाधव यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
         सत्कारास उत्तर देतांना शरद  जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि,मुलांनी स्वप्न बघावी व पालकांनी त्यांच्या स्वप्नांना बळ द्यावे असा मोलाचा संदेश दिला,तसेच एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने तसेच ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने शरद जाधव यांचा यथोचित सत्कार करून  कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
               सर्व उपस्थितांचे जाधव कुटुंबियांच्या वतीने जाधव सरांनी स्वागत करून आभार मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!