Homeकोपरगावश्रीमान गोकुळचंदजी विदयालयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

भारताचे संविधानाने सर्वाना समान अधिकार दिले आहेत.असे प्रतिपादन विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात भारतीय संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर पुढे म्हणाले,संविधानाने आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मता जोपासली असुन त्यामुळे देश एकसंघ वाटचाल करत आहे.

या प्रसंगी कोपरगांव एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव श्री.दीलीप अजमेरे,सहसचिव श्री.सचिन अजमेरे, स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे यांनी संविधान दिना निमित्तानं सर्वाना शुभेच्छा दिल्या.
या निमित्तानं शहरातून संविधान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी संविधान प्रतिमेचे पुजन करुन संविधान प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.रमेश गायकवाड यांनी केले.सूत्रसंचलन दीलीप कुडके केले तर आभार श्रीमती उमा रायते  यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!