Homeकोपरगावज्योती सह पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे मा.पोलिस निरिक्षक वासुदेव देसले साहेब यांच्या हस्ते प्रकाशन

ज्योती सह पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे मा.पोलिस निरिक्षक वासुदेव देसले साहेब यांच्या हस्ते प्रकाशन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

       भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून कोपरगाव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्थेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे प्रथम पुजन करून पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे मा.पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.     
       यावेळी मा.पोलीस निरिक्षक वासुदेव देसले,रविकाका बोरावके,देवराम सजन,प्रभाकर पाटील,शेखर भ़ोंगळे,राजेंद्र बोरावके,वाल्मीकभाऊ भास्कर,मच्छिंद्र पठाडे,नवले,रांधवणे, आदि मान्यवर उपस्थित होते.
            सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन करतांना मा.पोलीस निरिक्षक देसले साहेब म्हणाले की,महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून ज्योती सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले,या दिनदर्शिकेचा ग्राहक,शेतकरी,व्यापारी व हितचिंतकांना वर्षभर लाभ होईल. त्याचबरोबर पतसंस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!