Homeनाशिकसिन्नरभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

   भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने  एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
     त्याप्रसंगी शहा गावच्या सरपंच सौ.शुभांगीताई जाधव,एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम  स्कूलचे संस्थापक आदरणीय संभाजी जाधव सर,स्कूलचे विद्यमान प्रिन्सिपल मा. निळकंठ सर व सर्व सहकारी शिक्षक आदी उपस्थित होते.
      गावचे जबाबदार व्यक्ती म्हणून सरपंच शुभांगीताई जाधव,स्कूलचे संस्थापक संभाजी जाधव सर व शाळेचे प्रिन्सिपल निळकंठ सर व सहकारी शिक्षक खेडकर सर यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करण्यात आले.
            सदर प्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना इ.८ वी ची विद्यार्थिनी संस्कृती संधान हिने केली.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारास अनुसरून स्कूलचे विद्यार्थी व विद्यार्थिनीनी आपले मनोगत व्यक्त केले. 
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मा. प्रिन्सिपल निळ्कंठ सर म्हणाले कि, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे भारताने जगाला आदर्शवत ठरेल अशी लोकशाही प्रस्थापित केलेली आहे. त्याचबरोबर यांच्या जीवनाचा परिचय करून दिला.तसेच शिक्षिका शेख मॅडम यांनी प्रातिनिधिक स्वरूपात भाषण करतांना सांगितले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील उच्च - नीच भेदभाव नष्ट करण्यासाठी व मानवजातीच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.तद्नंतर संस्कृती संधान हिने सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!