

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
“पहिली बेटी धनाची पेटी ”बेटी बढाओ बेटी पढाओ ” उक्तीप्रमाणे नवजात शिशु चे स्वागत !!
तालुक्यातील कुंभारी येथील शेतकरी कुटुंबातील कै.यादव पुंजा गायकवाड यांच्या स्मरणार्थ व ग्रा.सदस्या सौ. किरण यशवंत गायकवाड यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल आजोबा सार्वजनीक वाचनालयाचे अध्यक्ष रमण यादव गायकवाड व आजी सौ.रंजनाताई रमण गायकवाड आणि यशवंत रमण गायकवाड यांनी इतरत्र खर्चाला फाटा देत,झालेला आनंद नवजात शिशु चे जन्माचे स्वागत करून व शालेय साहित्य चिमुकल्या बालगोपालांना वाटप करून शनिवार दि.१०डिसेंबर २०२२ रोजी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवुन केला साजरा.
" पहिली बेटी धनाची पेटी '' या उक्तीप्रमाणे यशवंत गायकवाड यांनी गायकवाड कुटुंबात कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल नवजात शिशु चे स्वागत करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारी येथील इ.१ली ते इ.५वी. पर्यंतच्या सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनींना उपयोगी वस्तु म्हणजे प्रत्येका जवळ पिण्याचे पाणी असावे,त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वाटर बॉटलचे वाटप करून समाजापुढे नविन आदर्श घालून दिला आहे.
यावेळी सरपंच दिगंबर बढे, माजी सरपंच विजयराव कदम,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव घुले,शाळेचे मुख्याध्यापक जगदाळे सर,सखाहारी देवकर,रमण यादव गायकवाड,कुंभारी सासायटी नं.१चे संचालक सतिष भास्कर कदम, सुधाकर धनवटे,शिवसेनेचे शेतकरी सेना तालुकाप्रमुख बाबासाहेब बढे, कुंभारी सो.नं. १चे संचालक सुनिल ज्ञानदेव कदम,सतिष घुले,पोलीस मित्र संघटनेचे राजेंद्र बढे, ग्रा.सदस्य ललित निळकंठ,डॉ.सुयोग पवार,पत्रकार संजय भारती, यशवंत गायकवाड, रिनाकांत कबाडी,दिनेश साळुंके, किरण बढे,निलेश गायकवाड,दिपक वाघ,सौ.आरती वाघ,सुरेश गायकवाड, सुनिल गायकवाड,रमण खंडु गायकवाड,विकास खळे,कैलास कबाडी,संतोष मोहरे,सचिन शंकर कदम,भागवत चंदनशिव आदि मान्यवर उपस्थित होते.
त्याचप्रमाणे शाळेचे सर्व शिक्षक -शिक्षिका व ग्रा.शिपाई रविंद्र व्हरे, पंपमन शंकर चंदनशिव यांचे सहकार्य लाभले.
शाळेचे शिक्षक श्री.झाडे सर यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत व शेवटी आभार मानले.
