

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
माजी.राज्यमंत्री प्रहारचे संस्थापक अध्यक्ष व दिव्यांगांचे कैवारी माननीय आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.१०डिसेंबर २०२२ रोजी शिर्डी येथील विश्वकर्मा मंदिर परिसरात प्रहार दिव्यांग क्रांती संघटना अहमदनगर व कोपरगाव,प्रहार दिव्यांग क्रांतीसंघटना रहाता व शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्यांग मार्गदर्शन मेळावा व पदविस्तार कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख माननीय दिलीप दिघे सर उपस्थित होते.तसेच अहमदनगर जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मणराव पोकळे सर, अहमदनगर जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख, अहमदनगर संपर्कप्रमुख नितीन चौधरी उर्फ ठाकरे साहेब,राहुरी तालुकाध्यक्ष मधुकरराव घाडगे,सिन्नर तालुकाध्यक्ष अरुण दादा पाचोरे,कोपरगाव शहराध्यक्ष प्रवीण भुजाडे,अहमदनगर जिल्हा संघटक परमेश्वर कराळे सर, आदि मान्यवर उपस्थित होते.वरील पदाधिकारी यांनी सरकारने आमदार बच्चुभाऊ कुड यांची स्वातंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापण करण्याची बऱ्याच दिवसाची मागणी कशी पूर्ण करण्यात आली याबद्दल सवितर माहिती देण्यात आली तसेच दिव्यांगांच्या विविध योजनाची माहिती दिव्यांगांना देण्यात आली.यामध्ये दिव्यांग 5%निधी, संजय गांधी योजना,अंतोदय रेशन कार्ड योजना,रेल्वे पास योजना या विषयी सविस्तर चर्चा व माहिती देण्यात आली.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमास शिर्डी व परिसरातील बहुसंख्य दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी राहता तालुका प्रहार दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष नितिन भन्साळी, उपाध्यक्ष अप्पासाहेब बनकर,राहता महिला अध्यक्षा अश्विनीताई विखे, कार्याध्यक्ष भाऊंनाथ गमे,जगन्नाथ सरोदे,शिर्डी शहराध्यक्ष कैलास यादगुडे,शहर उपाध्यक्ष सुनील आरने तसेच शिर्डी व राहता प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात दिलिप दिघे सरांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना सर्व शासकीय योजनांची अधिकृत माहिती दिली व प्रहारच्या संघटन वाढीसाठी कानमंत्र दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊनाथ गमे यांनी केले शेवटी नितिन चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
