
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव येथील नगर पालिकेच्या लोक शाहीर अण्णा भाऊ साठे खुले नाट्यगृहाचे काम आठ दिवसात सुरू न केल्यास प्रजासत्ताक दिनी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा लोक स्वराज्यआंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी नगर पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
आपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की,कोपरगाव येथील नगर पालिकेच्या लोक शाहीर अण्णा भाऊ साठे खुले नाट्यगृहाची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होतीमागील दिड वर्षांपूर्वी नाट्यगृह दुरुस्तीसाठी निधी मिळाला निविदा प्रसिद्ध झाली ठेकेदाराला काम दिले मात्र एक वर्षांपूर्वी ठेकेदार काम करत नसेल तर ठेकेदाराकडून काम काढून घ्यावे म्हणून 11/1/2022 रोजी निवेदन दिले मात्र नगर पालिका प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही.
यापूर्वी अनेक सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी निवेदन देऊन नाट्यगृह दुरुस्तीचे काम सुरू करावे म्हणून वेळोवेळी आंदोलने निवेदने दिली असून नगर पालिकेचे मुख्याधिकारी दखल घ्यायला तयार नाही म्हणून आज लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने लोक शाहीर अण्णाभाऊ साठे खुल्या नाट्यगृहाचे काम आठ दिवसाच्या आत सूरु करावे अन्यथा प्रजासत्ताक दिनी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू अशा इशारा या निवेदनाद्वारे अँड. नितीन पोळ यांनी दिला तसेच प्रजासत्ताक दिनी कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास नगर पालिका प्रशासन जबाबदार राहील असेही या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष गंगवाल,कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीचे आप्पासाहेब शिंदे,तुषार विध्वंस, भुमिपुत्र संघटनेचे निसार शेख,योगेश गंगवाल आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत.