
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव शब्द गंध साहित्यिक परीषदेचे उपाध्यक्ष,महाराष्ट्र साहित्यिक परीषदेचे माजी अध्यक्ष,बांधकाम व्यावसायातील प्रसन्न व्यक्तिमत्त्व,साहित्य क्षेत्रातील दिग्गज कलाकार,अनेकांचा एक सच्चा मित्र राजेंद्र (सुधिर)कोयटे यांचा एक्सष्टावा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला.तसा तो दरवर्षी साजरा केला जातो.परंतु या वाढदिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे,दरवर्षी काही तरी सामाजिक सेवाभावी उपक्रम राबविण्यात येतो.
राजेंद्र कोयटे म्हणजे कवी मनाचा,सामाजिक संवेदनशील जाणीवेने भारावलेला,"माणूस"यांच्या अनेक कवितांमधून, वात्रटिकांमधुन,चारोळ्यातून समाजातील व्यथा,वेदना,दुरावस्था शब्द बद्ध झाल्या आहेत.एकंदरीत शासन प्रशासनाकडून समाजाची झालेली अवहेलना,कुचंबणा परखड पणे मांडली आहे.समाजाच्या सुधारणेसाठी होणारी तगमग त्यांच्या साहित्यातून जाणवते.माजी.नगराध्यक्ष,वात्रटिकाकार विजयराव वहाडणे,कै.संजय कोद्रे,चारोळीकार,चित्रकार संत़ोष तांदळे यांनी एकत्रित पणे अनेक काव्य मैफिलीत रंगत भरली आहे. कोपरगाव शहराच्या विकासासाठी असणारी आस्था काव्यातून वेळोवेळी व्यक्त केली आहे.
सामाजिक संवेदनशील कविचा वाढदिवस वृक्षारोपण, कविसंमेलन,मान्यवर,गुणवंतांचा गौरव करून अनेक वेळा साजरा करण्यात आला आहे.यंदा साहित्यिक भुक भागविण्या साठी कवी नारायण सुमंत,प्रकाश घोडके यांच्या काव्य वाचना बरोबरच भारुड सम्राट भानुदास महाराज बैरागी आणि सहकलाकार,स्वच्छता दुत सुशांत घोडके,सुनील निसाळ,दत्ता पुंडे आदि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
एका संवेदनशील जाणीवेने होणारा वाढदिवस इतरांना प्रेरणा देऊन गेला.
कोपरगाव तालुक्यात साहित्यीक समारंभ अशा पद्धतीने का होईना होतात हि एक आनंदाची गोष्ट आहे.इतर साहित्यीक निश्चितच यातून प्रेरणा घेतील यात शंकाच नाही.देण्यासाठी खूप काही लागते असे नाही,फक्त देण्याची दानत असावी लागते,देणाराचे हात हजारो -या नभाने या भुईला दान द्यावे.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी. नगराध्यक्ष पदमकांतजी कुदळे हे होते,
सुत्रसंचलन सुशांत घोडके रमेश टोरपे यांनी केले.डॉ हिरालाल महानुभाव, लोणारी,राजेंद्र कोयटे यांच्या सुनबाई आदिंनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.कविसंमेलन व वाढदिवसाच्या समारंभासाठी अनेक मान्यवर, स्नेहीजन मित्रमंडळ उपस्थित होते.
अशा या प्रेरणादायी वाढदिवसाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.