Homeकोपरगावप्रोत्साहन अनुदानाचे कोपरगांव मतदार संघातील ७२० शेतकऱ्यांच्या खात्यावर २ कोटी ८० लाख

प्रोत्साहन अनुदानाचे कोपरगांव मतदार संघातील ७२० शेतकऱ्यांच्या खात्यावर २ कोटी ८० लाख

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

           शिंदे फडणवीस शासनाने नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदान योजने अंतर्गत प्रत्येकी ५०हजार रुपयांचा लाभ दिला असून पहिल्या टप्प्यातील ७२० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर २ कोटी ८० लाख ४ हजार ४५५ रुपये जमा केले आहेत.याकामी भाजपाच्या प्रदेश सचिव मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांनी सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.
          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टीने प्रोत्साहन अनुदान वितरणाची प्रक्रिया वेगाने राबवली असून दरम्यानच्या काळात निवडणूक आचारसंहिता हा विलंबाचा काळ वगळता सदर अनुदान वितरणाचे काम वेगाने होते आहे.
      या रक्कमेचा शेतकऱ्यांना निश्चितच आधार होणार आहे.कोपरगांव विधानसभा मतदार संघातील अशा लाभार्थी शेतकऱ्यांना जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांनी कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते.त्याच आधारे वर्तमान स्थितीत ७२० शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे.उर्वरित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्याही खात्यावर नियमित कर्ज फेड अनुदान रक्कम जमा करण्याबाबतचा पाठपुरावा मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या वतीने सुरू आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!