Homeकोपरगावमाता रमाई च्या त्यागामुळेच लाखोंचे संसार सुखाचे झाले - अँड.नितीन पोळ

माता रमाई च्या त्यागामुळेच लाखोंचे संसार सुखाचे झाले – अँड.नितीन पोळ

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत संसार करत असताना कोणत्याही प्रकारच्या स्त्री सुलभ ऐश्वर्याची अपेक्षा न करता माता रमाई यांनी केलेल्या त्यागामुळे लाखो दिन दलितांचे संसार सुखाचे झाले असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले.
          माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलन व भूमीपुत्र फाउंडेशन यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. 
             यावेळी पोळ पुढे म्हणाले की,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा महापुरुष घडविण्यात रमाई यांचे मोठे योगदान असून रमाई यांनी कोणत्याही स्त्री सुलभ सुख व ऐश्वर्या ची अपेक्षा न करता या प्रचंड मेहनत व त्याग केला मात्र त्यांच्या त्यागामुळेच आज लाखो दिन दलित कष्टकरी नागरिक सुखाचा घास घेत आहे ही फक्त रमाई आंबेडकर यांचा त्यागामुळे शक्य झाले. 
       यावेळी भूमिपुत्र फाउंडेशनचे निसारभाई शेख तसेच देवराम पगारे,पप्पू दिवेकर,अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!