
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
नगरपालिका ही शासनाची सेवा व विकास करणारी/देणारी स्थानिक स्वराज्य संस्था (सर्विस एजन्सी) आहे.गेल्या सव्वा वर्षापासून निवडणुका लांबल्या असल्यामुळे कोपरगाव नगरपालिकेत नगरसेवक व नगराध्यक्ष हे स्थानिक शहरातील प्रतिनिधी म्हणून नाहीहेत.त्यामुळें प्रशासक व मुख्याधिकारी या दोन्ही पदाचे चार्ज ज्यांच्याकडे आहेत असे मुख्याधिकारी शांताराम जी गोसावी साहेब यांनी आगामी वर्षाचे कोपरगाव नगरपालिकेचे बजेट सादर करताना खूप विचारपूर्वक,जनहिताचा विचार करून व शहराचा विकासाच्या दृष्टीने,काळजीपूर्वक बजेट सादर करावे.
फेब्रुवारी,मार्च महिनाजवळ आला की पुढील वर्षाचे बजेट,तरतूद हे सादर करावे लागते.नुकतेच केंद्र सरकारने आपले बजेट जाहीर केले.त्यानंतर आता महाराष्ट्र शासन लवकरच आपली बजेट जाहीर करेल.त्याचबरोबर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाही बजेट सादर करतात.मग ते कलेक्टर व नंतर महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी जाते.
यावर्षी कोपरगाव शहराची हद्दवाढ झाली आहे.शहरालगतचे सर्व छोटी छोटी उपनगरे/भाग शहराला जोडला गेल्यामुळे शहराची व्याप्ती वाढली आहे.पाणी,आरोग्य,लाईट,रस्ते,गटारी इत्यादी सुविधा लागतातच.
जनतेला दररोज स्वच्छ पाणी,आरोग्याची चांगली सुविधा,परिसर स्वच्छ्ता,दर महिन्याला डासासाठी औषध फवारणी,काही ठिकाणी पाण्याची पाईप लाईन टाकणे,स्वच्छ व सुंदर फिलट्रेशन पाणी,रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजवण्यासाठी सिव्हिल वर्क रिपेअर वर्कची तरतूद,धूळ रहित गाव करण्यासाठी,लहान मुलांना खेळायला गावातील सर्व भागात छान अशा खेळणीसह गार्डन/बागबगिचा,ज्या -त्या भागातील ओपन स्पेस/ मोकळ्या जागा विकसित झाल्या पाहिजे,ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित जॉगिंग ट्रॅक व त्यांनी एकत्र येऊन योगासने,हास्य क्लब यासाठीही व्यवस्था व्हावी,अमरधाम मधील काही काम आजुन करावयाचे असल्यास त्या कामासाठी निधी, कब्रस्थानसाठी, छानसे नाट्यगृह,शहरात पार्किंगची व्यवस्था, ठीक ठिकाणी महिला व पुरुष यांचेसाठी छोटेसे स्वच्छ अद्यावत सुलभ शौचालय,मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड,ठीक ठिकाणी रोडच्या कडेला जनतेला त्रास होणार नाही असे मोजके आरोग्यासाठी उपकरणे/छोटी जिमचे साहित्यसाठी,टपरी धारक यांचे साठी शॉपिंग सेंटर,छोटे खोका शॉप, ठीक ठिकाणी हॉकर्स झोन करण्यासाठी,झाडे जगवने/हरित गाव करणे वाढवणे,अद्यावत कचरा कुंड्या,वाचनालयातील कमी असलेल्या सुविधांसाठी,नगरपालिका शाळा सुधारण्यासाठी,भाजी मार्केट, मच्छी मार्केट,मटण मार्केट सुविधा देऊन अद्यावत करण्यासाठी, कर्मचारी हित सोय देयके.इत्यादी नगरपालिकेचे देयके.अश्या अनेक बाबींचा विचार करून बजेट मध्ये गाव व गावाची बाजार पेठ कशी वाढेल या साठी तरतूद करावी.जेणेकरून इलेक्शन झाले की पुढील काळात नगराध्यक्ष व नगरसेवक यांना काम करणे सोपे होईल.
गेल्या एक सव्वा वर्षापासून नगरपालिकेत प्रशासक आहेत.त्यामुळे यावर्षीचे बजेट सादर करताना कोपरगावच्या जनतेचा व शहर वाढीचा विचार करून आगामी पुढील एक वर्ष करावयाचे असलेले काम व त्यासाठी करावयाचे असलेले फायनान्शिअल बजेट/तरतूद याचा व्यवस्थित विचार करून ते करावे.कोपरगाव शहराचा विचार जर केला तर शहरात जनतेला लागणाऱ्या सुविधा त्या त्याबद्दल सांगण्यासाठी नगरपालिकेत नगरसेवक व नगराध्यक्ष नाही आणि शहरातील सर्वच नागरिक हे मुख्याधिकारी यांच्यापर्यंत जात नाही किंवा पोहोचू शकत नाही.
त्यामुळे जनतेला जे अपेक्षित आहे,जी कामे व्हायला पाहिजे व ज्या सुविधा त्यांना मिळायला पाहिजे त्याच्यासाठी लागणारा खर्च हा मुख्याधिकारी हे सध्या प्रशासक असल्याने त्यांनी काळजीपूर्वक जनहिताचा विचार करूनच ते सादर करावे अन्यथा पुढील वर्ष येणाऱ्या इलेक्शन नंतर,परत एक वर्ष विकासासाठी थांबवावे लागेल.ही जनतेच्या वतीने मुख्याधिकारी साहेब यांना मागणी......