Homeकोपरगावकुंभारीतील लिंगायत समाज बांधवांच्या वतीने गोपीनाथ निळकंठ व ललित निळकंठ यांचा सत्कार...

कुंभारीतील लिंगायत समाज बांधवांच्या वतीने गोपीनाथ निळकंठ व ललित निळकंठ यांचा सत्कार समारंभ संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

        कोपरगाव समता सहकारी पतसंस्थेचे संस्थापक तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा.श्री.ओमप्रकाश दादाप्पा उर्फ काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभारी येथील शेतकरी कुटुंबातील लिंगायत समाजाचे श्री.गोपीनाथ रामचंद्र निळकंठ यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल तसेच श्री.ललित चंद्रकांत निळकंठ यांनी कुंभारी ग्रामपंचायतमध्ये गेले पाच वर्षे सदस्य म्हणून यशस्वीरित्या जबाबदारीने कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल लिंगायत समाज बांधवांच्या वतीने दि.१४ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन्ही उभयतांना छत्रपतीं शिवाजी महाराजांची प्रतिमा,श्रीफळ,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
            सदर कार्यक्रमास सर्वश्री.पोपटराव निळकंठ, सत्कारमुर्ती गोपीनाथ निळकंठ,ललित निळकंठ,तसेच वाल्मीक निळकंठ सर,राजेंद्र निळकंठ,बाळासाहेब निळकंठ,अशोकराव निळकंठ,सोपानराव चिने,दिलिपराव निळकंठ,सुनिल गायकवाड, अतुल निळकंठ सर,संदिप निळकंठ आदि समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
    यावेळी प्रथम श्री.वाल्मीक नीळकंठ सर यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच सत्कार मूर्तीचे समाजासाठी असलेले योगदान तसेच त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात प्रास्तविक भाषणात माहिती सांगितली.त्याचप्रमाणे राहुल नीळकंठ यांनी सत्कार मूर्तीच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून त्यांना मिळालेले सदस्य पद हे समाजासाठीच नव्हे तर सर्वच घटकातील व्यक्तींसाठी महत्वाचे आहे.त्यांनी या अगोदर अनेक संस्थांमध्ये विविध पदावर यशस्वीरित्या व जबाबदारीने काम केल्याची ही पावती आहे. त्याच दृष्टीने मिळालेल्या पदाचा कार्यकाळ सर्वांसाठी चांगले काम करून ते यशस्वीरित्या पूर्ण करतील अशी अपेक्षा समाजाच्या वतीने व्यक्त करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
             सत्कारमूर्ती श्री.गोपीनाथ नीळकंठ सत्काराला उत्तर देतांना म्हणाले कि,समाजाप्रती असणारा आदर भाव पाहुण माझ्यावर असणारे दायित्व मी पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीन,समाज बांधवांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि प्रेम मी कधीही विसरणार नाही, शेवटी त्यांनी सर्वांचे आभार मानले व भावी वाटचालीमध्ये चांगले काम करून समाजाचे व गावाचे नाव उंचीवर घेऊन जाण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद व प्रेम सदैव माझ्या पाठीशी असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 
             कार्यक्रमाच्या शेवटी अतुल निळकंठ सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!