Homeकोपरगाववीज पुरवठा तीन दिवसात सुरळीत करा अन्यथा आमरण उपोषण - शेतकरी ग्रामस्थ

वीज पुरवठा तीन दिवसात सुरळीत करा अन्यथा आमरण उपोषण – शेतकरी ग्रामस्थ

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

             वीज वितरण कंपनी कडून अनियमित होत असलेला वीज पुरवठा तीन दिवसात सुरळीत करा अन्यथा खिर्डी गणेश सब स्टेशन समोर ग्रामस्थ आमरण उपोषण करतील असा इशारा नाटेगाव येथील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे कोपरगाव ग्रामीणचे अभियंता आचारी यांना एका निवेदना द्वारे दिला आहे.
 आपल्या निवेदनात नाटेगाव येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे की,आम्ही नाटेगाव येथील शेतकरी असून आमच्या नाटेगाव शिवारात शेत जमिनी आहेत सदर शेतजमीनित असलेल्या विहीर व बोअर वर वीज वितरण कंपनी कडून रितसर वीज कनेक्शन घेतले आहे सध्या रब्बीचा हंगाम आहे शेतीत उन्हाळ कांदा, गव्हू,मका ऊस आदी पिके आहेत नाटेगाव  येथील शेतकऱ्यांना खिर्डी गणेश सब स्टेशन मधून अत्यंत कमी दाबाने व अनियमित वीज पुरवठा केला जातो तसेच दिवसा वीज पुरवठा वारंवार खंडित केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.
        नाटेगाव फिडर वर येसगाव,ब्राम्हणगाव,पिंपळगाव जलाल,आदी गावच्या हद्दीतील १६ डीपी (ट्रान्सफार्मर ) चा जादा वीजभार टाकलेला आहे त्यामुळे नाटेगाव येथील शेतकऱ्यांना कमी दाबाच्या वीज पुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देणे अशक्य व जिकिरीचे झाले आहे या बाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांच्याकडे तक्रार केली मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाही त्यामुळे काल अनेक शेतकरी थेट कोपरगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात दाखल होऊन निवेदन देण्यास जमा झाले असता वीज वितरण कंपनीचे अभियंता आचारी हे शेतकरी आले हे पाहून निघून जात असताना संतप्त शेतकऱ्यांनी आचारी यांना अडवून आमचे निवेदन घेऊन तीन दिवसात वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा सर्व शेतकरी खिर्डी गणेश सब स्टेशनसमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला असे यावेळी राजेंद्र मोरे, दिपक मोरे,सागर मोरे,माणिक उळेकर,शरद मोरे,विक्रम मोरे, लक्ष्मण मोरे,गणेश राजुडे,गोरख मोरे,प्रभाकर मोरे,भरत मोरे, अशोक मोरे,राजेंद्र मोरे रंगनाथ मोरे आप्पासाहेब घोरपडे, विठ्ठल मोरे,केशव मोरे,शरद मोरे,दत्तू मोरे,सोपान मोरे आदींच्या सह्या आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!