Homeकोपरगावकुंभारी नगरीत श्री साई राघवेश्र्वर प्रतिष्ठानच्या वतीने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज...

कुंभारी नगरीत श्री साई राघवेश्र्वर प्रतिष्ठानच्या वतीने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया जल्लोषात साजरी

मुख्य संपादक – राजेंद्र तासकर

             आई तुळजाभवानीच्या कृपाशिर्वादाने कुंभारी नगरीत श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपळगाव येथील प्रसिध्द व्यापारी नाना खडके तसेच कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पो.हे.कॉ.श्री.मोरे एस.यु,पो.कॉ.शेख आर.डी यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व आरती करण्यात आली.
     याप्रसंगी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री.वाल्मीक निळकंठ यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात,श्री छ्त्रपती शिवाजी महाराजांचे विचार अमलात आणल्यास सर्वांगी विकास होईल असे सांगितले.सदर कार्यक्रमाची शोभा वाढविण्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी विराज दिपक वाघ यास महाराजांची वेशभूषा करून घोडयावर लेझिम पथकासह मिरवणुक काढली त्यावेळी सर्वांचे लक्ष वेधले गेले.विद्यार्थी - विद्यार्थीनींनी लेझिम पथकांच्या सहाय्याने महाराजांना मानवंदना दिली.या लेझिम पथकाचे ग्रामस्थांनी कौतुक केले यासाठी जि.प.प्रा.शाळेचे शिक्षक झाडे पी.जे यांनी परिश्रम घेतले व सर्व विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. 

यावेळी श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठानचे अधक्ष तसेच कुंभरी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री प्रशांत घुले, उपाधक्ष वाल्मीक नीळकंठ,सचिव श्रीकांत पैठणे,ललित नीळकंठ, दिलीप ठाणगे,म्हसू पवार,पत्रकार राजेंद्र तासकर,शुभम कदम,पांडुरंग पवार,गुलाब वाघ,माधव चंदनशिव, अण्णा चव्हाण,अर्जुन घूले,विजय कारभारी कदम,संतोष शिवाजी कदम, भास्कर चिने,त्र्यंबक वाघ,अभिजित चकोर,कोंडाजी चव्हाण,सागर घुले, अनिल मोहरे,शिवाजी भरती,चंदू मोहरे,सुभाष घुले,विठ्ठल घुले,बंडू चंदनशिव, दादराम खैरनार,भास्कर बढे,अमोल कोकाटे,ज्ञानेश्वर पवार, अमोल ठाणगे,महेश डांगे,वैभव चिने, शंकर शेळके,वसंत घुले,नाना शेजवळ, के पी रोकडे साहेब,डॉ.सुयोग पवार. जगन्नाथ भरती,विकास खळे,सुनील चंदनशिव,श्यामभाई शेख तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारी चे मुखाध्याक जगदाळे एस.जे, भांडकोळी टी.के,झाडे पी.जे, सौ.शिंदे जे.एम,सौ.पावले बी.एस यांसह आदि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!