Homeकोपरगावकुंभारीमध्ये युगंधर इंग्लिश मिडियम स्कूलच्या बालगोपालांचे स्नेहसंमेलन संपन्न

कुंभारीमध्ये युगंधर इंग्लिश मिडियम स्कूलच्या बालगोपालांचे स्नेहसंमेलन संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

          तालुक्यातील कुंभारी येथे गोदावरीच्या तटेवर व राघवेश्वराच्या पावण भूमीत यशवंत ग्रामीण बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित युगंधर इंग्लिश मिडियम स्कूल कुंभारी येथील बालगोपाल विद्यार्थ्यानी विविध गाण्यांवर आपले नृत्य सादर केली त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्तम साथ देत वार्षिक स्नेहसंमेलन दि.२४ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठया उत्साहात संपन्न झाले.
    सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम सहकारी बँकेचे संवत्सर शाखेचे शाखाघिकारी श्री.बाळासाहेब दत्तात्रय काळे हे होते तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वच्छतेचे उपासक श्री संत गाडगे महाराज व विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेस प्रथम पुष्पहार अर्पण करून पुजणं करण्यात आले.
           स्कूल बद्दलची माहीती स्कूलचे अध्यक्ष रमण गायकवाड यांनी प्रथम प्रास्तविकात मांडली तर मा.श्री. बाळासाहेब काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,ज्याप्रमाणे कर्मवीर माजी.खा.शंकररावजी काळे साहेब यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन खेडोपाडी शिक्षणाची गंगा आणून गोरगरिब व वंचित मुलामुलींसाठी शिक्षणाचा महामेरू उभा करुन उच्च शिक्षणातुन आजचे सुजाण नागरिक घडविले,त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन युगंधर इंग्लिश मिडियम स्कूलचे अध्यक्ष रमण गायकवाड यांनी आजच्या फास्ट युगानुसार खेडयातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या उद्देशाने खेडयातच पण सर्वांच्या दृष्टिने सहज तेथे जाऊन शिक्षण घेता येईल अशा पध्दतीने कुंभारी हा केंद्र बिंदु मानुन दि.११ नोव्हेंबर २०१३ रोजी "इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलु गेला गगणावरी "या युक्तीप्रमाणेच स्कूलची स्थापना केली व त्याची उत्तरो उत्तर प्रगती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली,आज येथे विद्यार्थ्यांनी अनेक गाण्यांवर आपल्या अंगी असणारे कला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर करत आनंद लुटला त्यांना आनंदीत पाहुन आम्ही भारावून गेलो त्यामुळे आम्हाला आमच्या शाळेतील लहान पण आठवले व आठवणी जागृत झाल्या असल्याचे श्री.काळे यांनी शेवटी सांगितले.त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
  यावेळी उपस्थितांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष व गौतम सहकारी बँकेचे संवत्सर शाखेचे शाखाधिकारी मा.श्री.बाळासाहेब दत्तात्रय काळे,सुर्यभान गंगाधर पवार,सुर्यभान रामभाऊ चतुर,सुनिल अशोक वारूळे सर,स्कूलचे अध्यक्ष रमण यादव गायकवाड, सार्वजनिक वाचनालयाचे सचिव यशवंत रमण गायकवाड, सिंधुताई आहेर,शाळेच्या शिक्षिका पानगव्हाणे मॅडम,पत्रकार संजय भारती,पत्रकार राजेंद्र तासकर,त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वेशभूषेसाठी अथक परिश्रम घेणारे दिगंबर चतुर यांसह आदि मान्यवरांचा सत्कार संस्थेच्यावतीने करण्यात आला.
         यावेळी कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत करणारा प्रेक्षकवर्ग चांगदेव चतुर,बाळासाहेब साबळे,दिपक वाघ,प्रसाद साळुंके,बाळनाथ चतुर,सिध्दार्थ साळुंके,किरण चतुर,बाबासाहेब भारती,वैभव गायकवाड,सतीश माधव कदम,किरण घाटोळे, विराज दिपक वाघ,आरती दिपक वाघ,आदिती दिपक वाघ, रंजना गायकवाड,किरण यशवंत गायकवाड,सोनाली चतुर, रघुनाथ खैरनार,प्रताप (किरण) तासकर,मोरे पाहुणे यांसह शाळेवर प्रेम करणारे पंचक्रोशितील अनेक ग्रामस्थ,पालक, विद्यार्थी - विद्यार्थिनी,किलबिल परिवार व महिला बहुसंखेने उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल अशोक वारुळे सर यांनी केले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!