
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
तालुक्यातील कुंभारी येथे महामानव,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त गौतम बौद्ध आणि डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास जेष्ठश्री.पाराजी रामजी पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्याचबरोबर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक मा.श्री. विवेकभैय्या कोल्हे तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व आमदार मा.श्री.आशुतोषदादा काळे यांनी कुंभारी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कुंभारी येथील धम्मप्रसारक भिम परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर सूत्रसंचालन श्री.वारूळे सर यांनी केले त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले यावेळी कुंभारी येथील बहुसंख्य ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी भिमजंयति उत्सव समितीच्या वतीने फळांचे वाटप करून उपस्थितांचे आभार मानले.