
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बुधवारी कृभको व सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाच्यावतीने जिल्हास्तरीय सहकार परिषदेचे उदघाटन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी कृभकोचे उपमहाप्रबंधक व्ही.एम.मोहरीर उपस्थित होते
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
शेतक-यांच्या हिताकरीता कृषक भारती को.ऑपरेटीव्ह लि.(कृभको) ही राष्ट्रीय पातळीवरील काम करणारी संस्था असून कृभकोने येथील शेतक-यांसाठी चालू हंगामात आठशे टन युरिया उपलब्ध करून द्यावा अशी मागणी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केली. अहमदनगर येथून मिळणा-या खतांची वाहतुक शेतक-यांना परवडत नाही तेंव्हा कोपरगांव रेल्वेस्टेशन येथे स्वतंत्र खताचा रॅक पॉईंट सुरू करण्यांत यावा या कोल्हेंच्या मागणीला कृभकोने हिरवा कंदील दिला आहे.

अहमदनगर येथुन शेतक-यांना खत वाहतुक परवडत नाही परिणामी वेळेत खते उपलब्ध होत नाही त्यासाठी कोपरगांव येथे नव्याने खत रॅक पाईंट उभारण्यात यावा. २००९.१० मध्ये आपल्या प्रयत्नाने येथे कृभको खत रॅक पाईंट सुरू केला होता. सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ विविध रासायनिक खते,बी बीयाणे किटक नाशके यांचा संपुर्ण मतदार संघात पुरवठा करते,त्याचबरोबर शेजारच्या येवला,वैजापूर तालुक्यातील शेतक-यांचीही काळजी घेते.सर्व सहकारी सोसायट्यांना किमान एक एक ट्रकभर कृभकोची सर्व खते उपलब्ध करून देवुन बफर स्टॉक करण्यात यावा,त्याचप्रमाणे चालु खरीप हंगामात शेतक-यांना सोयाबीनच्या सुधारीत फुले संगम, फुले किमया वाणाचे बी बीयाणे तात्काळ उपलब्ध करून द्यावे.
याप्रसंगी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर,उपाध्यक्ष बाजीराव वेणुनाथ मांजरे,संचालक रघुनाथ फटांगरे,नानासाहेब थोरात, चंद्रकांत देवकर,रामजी शिंदे, विलासराव कुलकर्णी,हिरालाल गायकवाड,प्रभाकर बढे,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार,कृभकोचे आरजीबी सदस्य पराग शिवाजीराव संधान, दत्तात्रय पंढरीनाथ मोरे,शिवाजीराव राधाकृष्ण दिवटे,कृषीतज्ञ प्रकाश सांगळे, कोपरगांव सहायक निबंधक कार्यालयाचे सर्व अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी, शेतकरी, तसेच दत्तात्रय सावंत,पोपटराव नरोडे, शिवाजीराव दवंगे,शिवाजी नाना गवळी,राहुल वाणी,विलास भाकरे, विजय साळुंके, संदिप चौधरी,वैभव आभाळे,अर्जुन निक्षे,दत्तात्रय निकम, रामदास शिंदे, प्रकाश शिंदे,संजय देवकर,बी.एस.जावळे,सुनिल सरोदे, कैलास बागल आदि उपस्थित होते. सुत्रसंचलन शेतकरी सहकारी संघाचे व्यवस्थापक हरिभाऊ गोरे यांनी केले तर कृभकोचे आरजीबी सदस्य शिवाजीराव दिवटे यांनी आभार मानले.