
मुख्य संपादक राजेंद्र तासकर
अहमदनगर जिल्हा बेसबाॕल असोशिएशनचा खेळाडू श्री.अक्षय मधुकर आव्हाड यास सन (२०२१- २२) बेसबॉल खेळामधील महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारची घोषणा जाहिर करण्यात आली
महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतीच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडुची घोषणा करण्यात आली आहे.
यामध्ये कोपरगांव येथील अक्षय आव्हाड यांस नुकतीच शिवछत्रपती पुरस्कार जाहिर करण्यात आली.
शालेय तसेच महाविदयालयीन जीवनात बेसबाॅल या खेळण्याची संधी व मार्गदर्शन अहमदनगर जिल्हा बेसबाॕलचे सचिव तसेच श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील पहिला खेळाडू या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडुचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. याबद्दल अक्षय आव्हाड याचे अहमदनगर जिल्हा बेसबाॕल असो.चे अध्यक्ष श्री.अरुण चंद्रे ,राज्य संघटनेचे सचिव राजेंद्र इखणकर,खजिनदार अशोक सरोदे,जिल्हा सचिव मकरंद को-हाळकर,तसेच क्रीडा संचालक व अक्षय आव्हाडचे प्रशिक्षक प्रा.सुनिल कुटे तसेच कोपरगाव तालुका क्रिडा समितीच्या वतीने,तसेच के.जे.सोमय्या महाविदयालय क्रिडा प्रेमी तर्फे हार्दिक अभिनंदन केले आहे.