
कमोड टॉयलेट अर्ज संकलन शिबिर संपन्न
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
दिव्यांग शक्ती सेवा संस्था व राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश लबडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिव्यांगासाठी कमोड टाँयलेट बसविणे बाबत अर्ज भरणे या उपक्रमाअंतर्गत शिबीराचे आयोजन करून राहुरी नगरपालिका हद्दीतील दिव्यांगांना लाभ देण्यासाठी अर्ज भरून घेण्यात आले.लवकरच राहुरी नगरपरिषद व तालुक्याचे आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्याकडे प्रस्ताव सादर करून दिव्यांगांना कमोड टॉयलेट मिळवून देणार आहे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले,सदर शिबिरास दिव्यांगांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

सदर शिबिर मिनी आय.टी.आय. राहुरी येथे घेण्यात आले.तसेच श्री योगेश लबडे यांना वाढदिवसानिमित्त सर्वच उपस्थित पदाधिकारी तथा दिव्यांग सैनिकांनी पुष्प गुच्छ शाल देऊन शुभेच्छा दिल्या.
योगेश लबडे यांनी वाढदिवसाचा अवांतर खर्च टाळून दिव्यांग शक्ती सेवा संस्थेस विविध उपक्रमासाठी १००० रुपये देणगी रक्कम दिली. दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्यावतीने योगेश लबडे यांचे आभार व्यक्त करतांना तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे म्हणाले कि,विशेष म्हणजे राहुरी तालुका राबवित असलेले दिव्यांगांप्रती स्नेहपुर्ति वाढदिवस सर्वत्र बहुचर्चित झाले असून इतरांना मार्गदर्शक ठरतात.दिव्यांगांच्या अडीअडचणी त्यांना उद्भवणारे प्रश्न यावर असणाऱ्या उपायोजना यासाठी सर्व उपस्थित पदाधिकार्यांमध्ये चर्चा झाली. संस्थेच्यावतीने दिव्यांगांच्या अडचणी सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे असे प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी यांनी सांगितले.तसेच दिव्यांगाचे साहित्य उदाहरणार्थ : टॉयलेट खुर्ची, व्हील चेअर,कुबड्डी,तीन चाकी सायकल,वाकर,चष्मा,कानाचे मशीन आदी साहित्य आपल्याकडे निकामी पडलेले असेल तर दिव्यांग सेवा संस्थेस देण्यात यावे,आपल्याकडील मिळालेले साहित्य गरजू दिव्यांगांना देण्यात येणार आहे.असेच दिव्यांगांप्रती सतकर्म करण्याचे आव्हान जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख यांनी केले आहे.
यावेळी तालुका सचिव दत्तात्रय खेमनर,तालुका सल्लागार बाबुराव शिंदे सर,तालुका समन्वयक ह भ प नाना महाराज शिंदे,ता.संघटक भास्कर दरंदले,टाकळीमिया शाखाध्यक्ष सुरेश दानवे,माहेगाव शाखाध्यक्ष भारत आढाव,गोटुंबा शाखा उपाध्यक्ष ह भ प आदिनाथ दवने महाराज,बा.नांदूर शाखाध्यक्ष शिवाजी जाधव,उपाध्यक्ष प्रतिक धिमते,राहुरी शहर सचीव जुबेर मुसानी,संदीप कुलकर्णी,कोळेकर काका,अनिल तनपुरे,सागर जगधने यांसह आदि उपस्थित दिव्यांग बांधवांचे आभार तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडे यांनी मानले.