Homeकोपरगावपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने दिव्यांग परिघा सुर्यवंशी यांचा सन्मान म्हणजे अभिमानाची बाब...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने दिव्यांग परिघा सुर्यवंशी यांचा सन्मान म्हणजे अभिमानाची बाब -सरपंच दिगंबर बढे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

तालुक्यातील कुंभारी गावातील गरीब कुटुंबाचा घरातील वयोवृध्द व दृष्टीहीन आईचा एकमेव आधार असलेली एक दिव्यांग महिला तिच्या व्यतिरिक्त घरात कमवता व्यक्ती नसलेली परंतु, हिमतीने व जबाबदारीने सर्व कर्तव्य पार करणारी वआपल्या दिव्यांगात्वावर मात करून अंगणवाडीमध्ये मदतनिस म्हणून कार्यरत असणारी,स्वीकारलेले काम वेळेत पूर्ण करून शासनाने अन्य दिलेले सामाजिक कामे न डगमगता हसतमुखाने व कोणावर विसंबून न राहाता प्रामाणिकपणे कर्तव्य करणारी गावातील पहिली दिव्यांग महिला म्हणून परिघा राजेंद्र सुर्यवंशी यांना मिळालेला पुरस्कार म्हणजे दिव्यांगांचा अभिमान असल्याचे गौरोद्गार सरपंच दिगंबर बढे यांनी काढले.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत स्तरीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या योगदानाबद्दल परिघा राजेंद्र सुर्यवंशी यांचा २०२३/२०२४ वर्षीचा पूण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार स्वरूप पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह,प्रसस्तीपत्र व रोख रक्कम देउन सन्मानित करण्यात आले.
सत्कारमुर्ती परिघा सुर्यवंशी सत्काराला उत्तर देतांना म्हणाल्या कि, मला धार्मिक कार्याची आवड आहे ” जनसेवा हिच ईश्वर सेवा ” मानून आपले कर्तव्य पार करीत राहिल्यास परमेश्वर सुद्धा त्याचे फळ पुरस्काराच्या रूपाने का होईना देतो याची प्रचिती आज मला आली आहे.प्रत्येकाने आपआपले कर्तव्य एकनिष्ठेने पार केल्यास प्रत्येकाचा सन्मान कधी ना कधी झाल्याशिवाय राहणार नाही असे त्या शेवटी म्हणाल्या.
यावेळी प्रशासक वाघमोडे बी.बी साहेब,सरपंच दिगंबर बढे, ग्रा.सदस्य सिंधुताई वसंत घुले,ललित निळकंठ, अशिष थोरात, ग्रामसेवक कासवे साहेब,कोतवाल नारायण ठाणगे,ग्रा. शिपाई रविंद्र व्हरे,पंपमन शंकर चंदनशिव,आरोग्य उपकेंद्राचे डॉ.अंत्रे, आरोग्य सेविका मनिषा पवार,वसंत लक्ष्मण घुले,अंगणवाडी सेविका, मदतनिस तसेच आदि विविध क्षेत्रातील कर्मचारी,महिला व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!