Homeकोपरगावकोपरगांव रेल्वे स्टेशन सुशोभीकरणासह सायडींग, कव्हरशेडची कामे तात्काळ पुर्ण करावी-पराग संधान

कोपरगांव रेल्वे स्टेशन सुशोभीकरणासह सायडींग, कव्हरशेडची कामे तात्काळ पुर्ण करावी-पराग संधान

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगांव रेल्वेस्टेशन सुशोभीकरणासह सायडींग,कव्हरशेड, बगीचा,रिक्षा व खाजगी वाहने पार्किंगसह सर्व कामे तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य व अमृत शुगरकेन संस्थेचे अध्यक्ष पराग शिवाजीराव संधान व रंगनाथ लोंढे यांनी सोलापुर मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनांत पुढे म्हटले आहे की,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे,जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांनी कोपरगांव रेल्वे स्टेशन अंतर्गत असणा-या सुविधांच्या परिपुर्ततेसाठी वेळोवेळी केंद्रीय रेल्वेमंत्री तसेच नामदार नितीन गडकरी यांच्या मार्फत मोठया प्रमाणांत पाठपुरावा केलेला आहे.
कोपरगांव तालुका ऐतिहासिक व विविध संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असुन अहमदनगर,नाशिक आणि औरंगाबाद या तीन जिल्हयाच्या सीमेवर असल्याने व जवळच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्री.साईबाबा शिर्डी देवस्थान,श्रीक्षेत्र पुणतांबा येथील चांगदेव महाराज,राष्ट्रसंत जनार्दन स्वामी, जंगलीदास माउली,श्रीक्षेत्र गुरु शुक्राचार्य,मंजूर देवस्थान शिवानंदगिरी महाराज,कोकमठाण येथील ऐतिहासिक प्राचिन हेमाडपंथी मंदिर संवत्सर येथील शृंगेश्वर महाराज,चक्रधरस्वामीदेवस्थान आदि ऐतिहासिक व धार्मीक परिसराला दर्शन व भेटी देण्यासाठी हजारो भाविक येथे रेल्वेने येत असतात.भाविकासह परिसरातील प्रवाशी,नागरिकांना कोपरगांव रेल्वे स्थानकात विविध पायाभूत सुविधा मिळाव्या म्हणून आम्ही यापुर्वीही सातत्याने विविध मागण्यांचा पाठपुरावा केलेला आहे.सध्या कोपरगांव रेल्वेस्टेशन विस्तारीकरणाचे काम सुरू आहेत त्यात पॅसेंजर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर कव्हरशेडचे काम त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ वरही कव्हरशेड करून प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच सुलभ शौचालयासह स्वच्छतागृहाची व्यवस्था,अंतर्गत प्रवाशी व परिसरातील रहिवासी नागरिकांना प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून दुस-या प्लॅटफॉर्मवर ये जा करण्यासाठी स्वयंचलित जिना,अमृत योजनेच्या गती शक्तीतुन कोपरगांव रेल्वेस्टेशन सुशोभीकरण,अद्यावत सुसज्ज रिक्षा स्टैंड,त्यांच्यासाठी पार्किंग तसेच खाजगी वाहनांसाठी पार्कींग,भक्तासाठी श्री.साईबाबांचे मंदिर, उर्वरित जागेत बगिचाचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे.
त्याचप्रमाणे कोपरगाव रेल्वेस्टेशन अंतर्गत लॉंग गुड शेड सायडिंगचे काम सध्या सुरू आहे.त्याचे शेजारील रोडचे कामाबरोबरच सायडींगचे कॉक्रीटी करण तातडीने पुर्ण करून सायडींगमध्ये मालाची चढ उतार करणा-या लेबरसाठी पिण्यांच्या पाण्यांची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे सायडींग परिसरातील रहिवासी नागरिक व प्रवाशांना इकडुन तिकडे ये जा करण्यासाठी भूयारी मार्गाची निर्मीती अगर सदर ठिकाणी ओव्हर ब्रिज तयार करण्यात यावा.वंदे भारत रेल्वेला कोपरगांव येथे थांबा देण्यांत यावा यासह अन्य मागण्या तात्काळ पुर्ण करून नागरिकांसह रेल्वे प्रशासनाने सर्वांना दिलासा द्यावा असेही शेवटी निवेदनांत म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!