Homeकोपरगावश्री साई राघश्वेर प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबीर...

श्री साई राघश्वेर प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

तालुक्यातील कुंभारी येथे श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठाणच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबिर दि.५ जुन २०२३ रोजी मोठया उत्साहात संपन्न झाले.

श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठाण व श्री साईनाथ ब्लड बँक शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभारी येथील सभागृहात साईबाबांच्या प्रतिमेचे पुजन आश्रमाचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते व तालुका कृषी अधिकारी मा. मनोज सोनवणे साहेब,पंचायत समितीचे माजी.उपसभापती अर्जुनराव काळे,कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पी.आय.मा.वासुदेव देसले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व सर्व कुंभारी ग्रामस्थ यांच्या सहकार्यातुन भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख मान्यवरांचे श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी राघवेश्वर देवस्थानचे महंत श्री श्री१०८ महंत राघवेश्वरानदंगिरी जी महाराज,पंचायत समिती उपसभापती मा.अर्जुनराव काळे साहेब,कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पी.आय.मा. वासुदेव देसले साहेब,तालुका कृषी अधिकारी मा.मनोज सोनवणे साहेब, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. शिवाजीराव घुले,गौतम पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य मा.भारती सर, लोकनियुक्त सरपंच तसेच श्री.साई राघवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.प्रशांत घुले,उपाध्यक्ष मा.वाल्मिक निळकंठ सर,सचिव मा.श्रीकांत पैठणे,ग्रा.सदस्य ललित निळकंठ,वसंत ल.घुले,चंद्रभान बढे,ग्रामसेवक कहार साहेब,साईनाथ ब्लड बँकचे सन्माननीय डाॕक्टर सौ. पितांबरे मॅडम व त्यांची संपूर्ण टीम, तसेच श्री.साई राघवेश्वर प्रतिष्ठाणचे पदाधिकारी,सर्व सदस्य,महिला,तरूण व ग्रामस्थ आदि मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वाल्मीक निळकंठ सर यांनी श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान गेल्या दशकापासून गावामध्ये कोणकोणते उपक्रम राबवत आहे व त्या उपक्रमामुळे गावासाठी काय फायदा झाला याची सविस्तर माहिती देऊन यामधून नव युवकांनी प्रेरणा घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आश्रमाचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानदंगिरीजी महाराज यांनी आशीर्वाद रूपी आपले मनोगत व्यक्त केले.

त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी.उपसभापती मा.अर्जुनराव काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,

आजच्या परिस्थितीत रक्तदान करणे खूप गरजेचे आहे,आपल्या रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव वाचतो,”रक्तदान हे श्रेष्ठ दान”आहे. यावेळी रक्तदानाचे महत्व पटवून दिले यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन रक्तदान करावे असे ही आव्हान केले.

सदर रक्तपिढ्यांनी रक्तदात्यां बरोबर कसा व्यवहार करावा व जास्तीत जास्त गरजवंत पेशंटला लवकरात लवकर रक्त कसे पुरवता येईल याचे काही उदाहरणे देत मार्गदर्शन करून, आजच्या युगात झाडे लावल्यानंतर पुढील पिढीसाठी हे कसे लाभ दायक ठरतील याबद्दलची माहीती तालुका पोलीस स्टेशनचे पी.आय.मा.वासुदेव देसले साहेब यांनी दिली.

तालुका कृषी अधिकारी मा.मनोज सोनवणे यांनी, गावात कोणकोणत्या प्रकारची झाडे लावल्यानंतर, कोणकोणत्या प्रकारच्या सरकारी योजना राबवता येऊ शकतात याबद्दल सविस्तर माहिती दिली केले.

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक मा.शिवाजीराव घुले यांनी रक्तदान शिबिराचे महत्त्व थोडक्यात सांगून,वृक्षारोपणाच्या माध्यमातून हरितक्रांती व स्वच्छ आणि सुंदर कुंभारी यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेत आहे.यासाठी वृक्षप्रेमी सहभाग देत आहेत आजपर्यंत ज्यांनी सहभाग दिला त्यांचे कौतुक करून सर्वांचे विशेष आभार मानले.

गौतम पॉलिटेक्निकचे प्राचार्य मा. भारती सरांनी सांगितले कि,दरवर्षी मी स्वतःचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करतो तसेच काही औषधी वनस्पतींचा मानवी जीवनामध्ये कसा उपयोग होतो या विषयी त्यांनी माहिती दिली व आलेल्या मान्यवरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करुन श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठानच्या टिमला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत घुले यांनी वृक्षारोपणसाठी वृक्षप्रेमींनी केलेल्या भरीव योगदानाविषयी उपस्थित ग्रामस्थांना माहिती दिली.या रक्तदान शिबीरामध्ये २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले

यामध्ये महिलांनीही रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला या सर्वांना श्री.साईनाथ ब्लड बँकेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले व त्यांच्या हस्ते वड,पिपंळ,चिंच,जाबुंळ, उंबर,कांचन अशा २२ प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. अतुल निळकंठ सर यांनी केले,तर शेवटी श्री.साई राघवेश्वर प्रतिष्ठाणचे सचिव मा.श्रीकांत पैठणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!